Home ब्रेकिंग न्यूज KSBKBT2 off air: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक

KSBKBT2 off air: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक

0
KSBKBT2 off air: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक
social media

‘क्योंकि सास भी कभी बही थी 2’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्मृती इराणी यांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केले. बऱ्याच वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिक प्रेक्षकांचा भेटीला आल्या. परंतु, आता त्यांची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेला कौटुंबिक ड्रामा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ अखेर ऑफ-एयर झाला आहे. शोचा शेवटचा भाग 20 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या निरोपाच्या पार्श्वभूमीवर निर्माती एकता कपूर तसेच तुलसीच्या भूमिकेत पुन्हा झळकलेली अभिनेत्री स्मृती इराणी भावुक झाल्या असून, दोघींनी ही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.(KSBKBT2 OFF AIR )

https://www.prahaar.in/2026/10/21/jailer-2-mohanlal-body-double-actor-revealed/

एकता कपूर यांनी स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांच्यासह शोमधील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आज या शोचा शेवटचा भाग. काही निरोप खूप कठीण असतात, पण या शोविषयी माझ्या मनात नेहमीच प्रेम राहील.” त्यांनी खुलासा केला की मूळात हा शो केवळ 167 भागांसाठीच नियोजित होता, पण प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमामुळे तो 450 भागांपर्यंत पोहोचला.स्मृती इराणी यांनीही संपूर्ण प्रवासाला ‘भावनांच्या रोलर-कोस्टर राईड’ची उपमा दिली. “नव्या आठवणी घडल्या, जुन्या कथा पुन्हा ताज्या झाल्या,” असे लिहीत त्यांनी ‘हम हैं राही प्यार के, फिर मिलेंगे चलते-चलते’ असे म्हणत निरोप दिला.(SMRITI IRANI)

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’चा प्रीमियर 29 जुलै 2025 रोजी झाला होता. मूळ प्रतिष्ठित शोचा हा सीक्वल आणि रीबूट होता, ज्यात स्मृती आणि अमर उपाध्याय ही तुलसी-मिहिरची हिट जोडी पुन्हा एकत्र आली होती. स्मृती इराणी यांच्या या मालिकेत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या पहिल्या पर्वातील अनेक कलाकार पाहायला मिळाले, त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरू होणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता वाढली होती. ‘क्योंकि सास भी कभी बही थी 2’ मधील अभिनेता हितेन तेजवानी याने सुद्धा याबद्दल सांगितलं आहे. या मालिकेत तो करण ही भूमिका साकारत होता, तसेच मालिकेच्या पहिल्या पर्वाचाही तो भाग होता. ‘इंडिया फोरम्स’ शी संवाद साधताना त्याने ही मालिका बंद होणार असल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.(EKTA KAPOOR)

https://www.prahaar.in/2026/10/20/3-days-after-the-death-of-music-composer-deva-his-nephew-actor-kartik-sabesh-passed-away-at-the-age-of-37/

हितेशने या वर काय दिली प्रतिक्रिया?

हितेन याबद्दल सांगितले, “मला याबद्दल काहीही कल्पना नाही, कारण मी नियमितपणे शूटिंगला जात नाही. मोजकेच दिवस माझे शूटिंग असतं. जर मी सेटवर असलो असतो तर मला याबद्दल कदाचित माहिती असती. पण, फक्त काहीच दिवस तिथे असल्यामुळे आणि आता पुन्हा यूएसला आल्यामुळे मला याबद्दल काही माहिती नाही. हितेनने पुढे असे ही सांगितलं की, “जेव्हा मला या मालिकेसाठी फोन आला होता तेव्हा सांगण्यात आलेले की पहिल्या भागाप्रमाणे हा भाग फार काळ सुरू राहणार नाही. ठराविक कालावधीपुरताच मालिका सुरू राहील. त्यामुळे आता वाहिनीने किंवा प्रॉडक्शन टीमने नेमका काय निर्णय घेतला असेल, याबद्दल मला काही माहिती नाही.”(HITESH TEJVANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here