Home ब्रेकिंग न्यूज Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न

Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न

0
Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न
रशिया-युक्रेन युद्ध आणि ट्रम्प (फोटो सौजन्य: ANI)

वॉशिंग्टन: चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक निर्णय घेतला आहे. सातत्याने युद्ध संपवण्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट ही संपूर्ण जबाबदारी युक्रेनवर ढकलली आहे. रशियाचे पारडे जड असल्याचे सांगत त्यांनी वॉशिंग्टनच्या भूमिकेत मोठा बदल केला असून, या नव्या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

रशियाचे पारडे जड, ट्रम्प यांची युक्रेनवर जबाबदारी

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, युद्धात युक्रेन रशियाच्या तुलनेत खूप मागे पडत आहे. मॉस्कोने अनेक नवीन प्रदेशांवर ताबा मिळवला असून, युक्रेनला आपली स्थिती टिकवून ठेवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता युक्रेननेच स्वतःहून हे युद्ध संपवण्याची इच्छा दाखवली पाहिजे. रशिया ही एका अवाढव्य यंत्रासारखी ताकद असून सातत्याने पुढे सरकत आहे, असे ट्रम्प म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/10/21/historic-monument-reduced-to-ashes-amidst-the-fires-of-protest-french-citizens-express-deep-anger-and-sorrow/

वॉशिंग्टनला मदतीच्या बदल्यात काय मिळाले?

अमेरिकेने गेल्या अनेक वर्षांपासून युक्रेनला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत आणि लष्करी उपकरणांचा पुरवठा केला आहे. या मदतीचा उल्लेख करत ट्रम्प यांनी, “यातून वॉशिंग्टनला नेमके काय मिळाले?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. या मदतीच्या बदल्यात अमेरिकेला फक्त दुःख, मृत्यू आणि मोठे आर्थिक नुकसान यांशिवाय काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्लादिमिर पुतिन आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यातील तीव्र वैरामुळे दोन्ही नेते एकाच टेबलावर चर्चा करण्यास तयार नाहीत.

डिझेल खरेदीला हिरवा कंदील आणि मध्यावधी निवडणुकांचे राजकारण

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अमेरिकेत इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प यांनी थेट रशियाकडून डिझेल खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे रशियावरील निर्बंधांमध्ये काहीशी नरमाई आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थिती बिकट असल्यानेच ट्रम्प यांनी रशियाबाबत ही नरमाईची भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here