मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. विरोधकांच्या वागणुकीवरून उपमुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली आहे. भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरे सेनेला चांगलेच टीकेचे धनी केले आहे. घरी बसून सरकार चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंवर चांगलीच टीका केली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/20/dcm-eknath-shinde-criticized-the-maha-vikas-aghadi-and-uddhav-thackeray-through-the-dussehra-melava-2026/
उपमुख्यमंत्री म्हणाले, ” आम्ही संकटकाळामध्ये जनतेच्या मदतीला धावून जातो. जिथे जनता संकटात असेल तिकडे शिवसेनेचे सर्वच आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी सर्वच जनतेच्या मदतीला धावून जाते. आम्ही केव्हाही घरात बसून सरकार चालवत नाही. “जिथे संकट, तिथे शिवसेना”, “जिथे आपत्ती, तिथे एकनाथ शिंदे”, हे समीकरण आहे. मदतीच्या माध्यमातूनच शिवसेनेच्या नेत्यांनी जनतेच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे.”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/20/would-you-at-least-take-a-packet-of-biscuits-along-dcm-eknath-shinde-sharp-dig-at-the-opposition-regarding-aid-for-drought-affected-farmers/
“आज, शिवसेनेचे 15 खासदार दिल्लीत आहेत. राज्यात 74 आमदार आहेत, 1000 हून अधिक नगरसेवक, 63 नगराध्यक्ष ही शिवसेनेची ताकद आहे. ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आनंद दिघे यांच्या शिवसेनेची ताकद आहे. आम्ही काम करतो म्हणून, आम्हाला जनतेने निवडून दिलंय. हा शिवसैनिकांचा विजय आहे. कामाप्रती असलेली निष्ठा आहे. इथे कोणी मालक नाही, इथे सर्वच कार्यकर्ते आहेत. ही पोट दुखी होतेय ना, जळजळ, मळमळ, कोणी पुढे गेला की त्याचा खड्डा खोदा, खड्डा खोदणाऱ्यांचे खड्डे खोदलेलेच आहेत. त्यामुळे काम करत राहा, टीका करू नका. कामातून विरोधकांना प्रत्युत्तर द्या…”