Home ब्रेकिंग न्यूज टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!

0
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!
tiger shroff firing case

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असताना, मुंबई पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या घटनेत हल्लेखोरांनी वापरलेली एक संशयित मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून, ११ सप्टेंबर रोजी खरेदी करण्यात आलेल्या या गाडीचा वापर हल्ल्याची योजना आखण्यासाठी किंवा परिसराची रेकी करण्यासाठी केला गेला होता का, या दिशेने आता पोलीस वेगाने तपास करत आहेत.

आरोपींची नावे आणि त्यांची भूमिका

https://www.prahaar.in/2026/10/20/tiger-shroff-firing-case-all-3-accused-are-adults-aged-18-18-22-says-mumbai-crime-branch-dcp-videos/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात तीन मुख्य आरोपींचा सहभाग आहे. ऋतिक उर्फ रोशन: हा तरुण बजाज पल्सर मोटरसायकल चालवत होता. रेहान आणि फूल सिंग: या दोघांनी प्रत्यक्षात गोळीबार केला होता. ही गाडी नेमकी कोणी खरेदी केली, गोळीबार करण्यामागे मुख्य सूत्रधार कोण होता आणि त्यांना कोणाचे मार्गदर्शन होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आधी एक आरोपी अल्पवयीन असल्याची चर्चा होती, मात्र मुंबई पोलिसांनी ती अफवा फेटाळून लावत तिन्ही आरोपी सज्ञान असल्याचे स्पष्ट केले. डीसीपी राज तिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एका आरोपीचे वय १८ वर्ष तर इतर दोघांचे वय २२ वर्ष आहे. हे तिन्ही आरोपी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून पळून जात होते. कोटाचे पोलीस अधीक्षक तेजस्वनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी कोटा स्थानकावर थांबताच अवघ्या १५ मिनिटांत पोलिसांनी सापळा रचून या तिघांनाही जेरबंद केले. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे ऋतिक उर्फ रोशन (बेगूसराय, बिहार), रेहान (सोनिपत, हरियाणा) आणि फूल सिंग (हरियाणा) अशी आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल २० विशेष क्राईम ब्रँचची पथके तयार केली होती.

पळून जाण्याचा मार्ग आणि पोलिसांची कारवाई

अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ संशयित मोटरसायकल सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी आधी उत्तर मुंबईकडे आणि तिथून सुरतच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ट्रेन पकडल्याची माहिती मिळताच, कोटा पोलिसांच्या मदतीने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आणि नंतर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन

या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले जात आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी रेहान हा लॉरेन्स गँगचा सक्रिय सदस्य अनिल पंडित याच्या संपर्कात होता. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक सोशल मीडिया पोस्ट आणि एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अमेरिकेतून कारभार चालवत असल्याचा संशय असलेला ३२ वर्षीय गँगस्टर अनिल पंडित याचा आवाज असलेली एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये, अभिनेता सलमान खानसोबत काम करू नये, याआधी दिलेल्या वार्तिकेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच टायगर श्रॉफला टार्गेट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी अद्याप पोलिसांनी केलेली नाही.

यामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने सलमान खान आणि बिश्नोई समुदायाची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणाशी हा जुना वाद जोडलेला आहे, कारण काळवीट हा प्राणी बिश्नोई समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. जर सलमान खानने माफी मागितली नाही, तर त्याच्यासोबत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या इतर कलाकारांनाही अशाच प्रकारच्या धमक्यांचा सामना करावा लागेल, अशी उघड धमकी या ऑडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा अत्यंत कसून तपास करत असून, लवकरच यामागील इतर चेहऱ्यांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here