मुंबई: चित्रपट निर्माते अमित जानी यांनी हरियाणातील सोनीपत येथे आपल्या वाहनाचा पाठलाग केल्याची आणि आपल्यावर हलल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदवली आहे. निर्मात्यांच्या आरोपानुसार, वैष्णो देवीच्या दर्शनावरून परतत असताना, देवडू गावाजवळ एका पांढऱ्या रंगातील कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी शस्त्रे दाखवून त्यांचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना सतर्क केले. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कुंडली पोलीस ठाणे गाठले. विशेष म्हणजे, अमित जानी यांना आधीच ‘वाय'(Y) श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. (AMIT JANI)
https://www.prahaar.in/2026/10/19/breaking-three-arrested-in-connection-with-attack-on-tiger-shroff/
व्हाइट कार मधून कोण करत होते पाठलाग
अमित जानी वैष्णो देवीच्या दर्शनावरून परतत होते. काल (18 ऑक्टोबर- रविवार) रात्री 9 च्या सुमारास, देवदू गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 352- A वर असताना, एका पांढऱ्या रंगातील कारमधील लोकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. आरोप आहे की, या लोकांनी शस्त्रे दाखवून त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर, अमित जानी यांनी पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर, स्वतःच्या सुरक्षेसाठी ते कुंडली पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी कुंडली आणि मुरथल या दोन्ही पोलीस ठाण्यांत या प्रकरणाबाबत लेखी तक्रारही दाखल केली आहे. सध्या मुरथल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोण आहेत अमित जानी?
दरम्यान, अमित जानी यांनी असा आरोप केला आहे की, सोनीपतमध्ये त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि शस्त्रे दाखवून त्यांचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेच्या वेळी त्यांच्या वाहनात चित्रपट दिग्दर्शक भरत सिंग श्रीनेत यांच्यासह इतर काही व्यक्तीही उपस्थित होत्या. अमित जानी ह्यांनी ‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये विजय राज मुख्य भूमिकेत होता. याव्यतिरिक्त, अमित जानी त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये सध्या व्यग्र आहे. लवकरच अमित यांचे, ‘काला हिरण’ आणि ‘कल्की संभल’ हे चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी अमितला हिमांशू भाऊ, रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांसारख्या व्यक्तींशी संबंधित टोळ्यांकडून धमक्या मिळाल्याची तक्रार पोलिसांत त्यांनी यापूर्वी केली होती. त्यांना भारत सरकारने पूर्वी ‘वाय’ (Y) श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/19/whoever-the-mastermind-behind-this-may-be-they-will-soon-chief-minister-devendra-fadnaviss-reaction-to-the-tiger-shroff-firing-incident/
दरम्यान, काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर अंधेरीतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये अभिनेता किरकोळ जखमी झाला असून त्याची तब्येत सध्या व्यवस्थित आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. AGTF आणि कोटा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गोळीबाराची घटना घडल्यानंतर तिन्ही संशयित फरार झाले होते. ते मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एजीटीएफ आणि कोटा पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. त्यानंतर कोटा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.