Home ब्रेकिंग न्यूज Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला…खासगी इमारतींची मुंबईत

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला…खासगी इमारतींची मुंबईत

0
Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला…खासगी इमारतींची मुंबईत
सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत (Photo Google)

सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव पश्चिम येथे माईंड स्पेस गार्डन जवळील बांधकामात तब्बल ४० झाडे बाधित होत आहेत. यामध्ये ३ झाडे कापली जाणार आहेत आणि ३७ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात बदलापूर येथील वन विभागाच्या जागेत ७६५ झाडांची लागवड केली जाणार आहे. एका बाजुला मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील बाधित झाडांच्या बदल्यात बदलापूरमधील वन जमिनीनीवर झाडांची Tree Plantation Badlapur, Mumbai Tree Cutting, Alternative Tree Plantation, Maharashtra Environment News, Government Projects Maharashtraलागवड केली जात असतानाच दुसरीकडे खासगी गृहनिर्माण प्रकल्पांतील बाधित झाडाच्या बदल्यात संजय गांधी राष्ट्रीय उदयान आणि युसुफ इस्माईल कॉलेज परिसरात झाडे लावली जाणार आहेत. मग खासगी गृहनिर्माण संस्थांच्या विकासकांना मुंबईत जमिन प्राप्त होते आणि महापालिकेला आपल्या प्रकल्पासाठी बदलापूरमधील वन विभागाच्या जागेचा शोध घ्यावा लागतो याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/18/india-women-vs-zimbabwe-women-2nd-t20-match-india-secure-victory-finishing-on-104-1/

पी दक्षिण विभागातील मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट उत्तर पॅकेट बी अंतर्गत गोरेगाव पश्चिम येथील माईंडस्पेस गार्डनजवळ एमडीपी रोडवरील एकूण ४० झाडे बाधित होत आहेत. कोस्टल रोडच्या आंतरबदलाच्या पुलाच्या निर्मितीसाठी नियोजित तात्पुरत्या स्वरुपाच्या पुलाच्या बांधकामा व खोदकामात बाधित होत आहेत. त्यात ३ झाडे कापावी लागत आहेत तर ३७ झाडे पुनर्रोपित करावे लागणार आहे. या झाडांच्या बदल्यात एकूण ७६५ झाडांची लागवड केली जाणार होती. पुनर्रोपित झाडांच्या बदल्यात पवईजवळ साकीनाका रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळी ५१३१ चौरस मीटरची जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु कोस्टल रोड प्रकल्पांसह भांडुप संकुलातील पंपिंग स्टेशनच्या बांधकामांसह इतर यंत्रणांच्या कामांमध्ये बाधित झाडांच्या लागवडीसाठी ठाणे वन विभागातील बदलापूर वन परिक्षेत्रातील मौजे कुशीवली येथे १५ हेक्टर, मौज वाडी येथे १५ हेक्टर आणि मौजे आंबा येथे १० हेक्टर पैंकी ४ हेक्टर क्षेत्र हे भरपाई स्वरुपातील वृक्षारोपणासाठी राखीव ठेवलेले आहे. त्यामुळे या राखीव ३ लाख ४० हजार चौरस मीटर भरपाई स्वरुपातील झाडे लावण्यात येणार आहेत.

तर वांद्रे पश्चिम येथील वांद्रे डी गावचा पाली हिल रोड, नर्गिस रोडवरील नियोजित इमारतीच्या बांधकामांमध्ये ६३ झाडे बाधित होत आहेत. त्यात २८ झाडे कापण्यास आणि ३५ झाडे पुनरोर्पित केली जाणार आहेत. या बदल्यात ११७५ झाडांची लागवड केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या जागेवर पर्याप्त जागा उपलब्ध नसल्याने भरपाई म्हणून नवीन झाडे ही आरे, तुळशी वन परिक्षेत्र आणि बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावली जाणार आहेत.

तर अंधेरी पूर्व येथील जे.पी.डायस कंपाऊंड येथील जय हनुमान एस आर ए प्रकल्प, तेजोमय एसआरए प्रकल्प, तसेच बिगर झोपडपट्टी एसआरए प्रकल्प, विघ्नहर्ता एसआर ए प्रकल्प जोगेश्वरी पूर्व येथील हिंदु फ्रेड्स सोसायटी नटवरनगर रोड क्रमांक ५ आणि अतिरिक्त बिगर झोपडपट्टी इमारत बांधकामांमध्ये ३० झाडे बाधित होत असून त्यात २२ झाडे कापणे आणि ०८ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहे. या बाधित झाडांच्या बदल्यात ५५० नवीन झाडे लावली जाणार आहेत, ही नवीन झाडे जोगेश्वरी पूर्व येथील युसुफ इस्माईल कॉलेजमधील ४९५० चौरस मीटर जागेवर लावली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here