मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज जरीही हयात नसल्या तरीही त्या त्यांच्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. स्मिता यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांनी काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत स्मिता यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज बब्बर यांनी शेअर केलेली इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.prahaar.in/2026/10/18/rise-of-a-legend-to-make-history-a-moment-of-pride-for-india/
स्मिता यांचा फोटो शेअर करत राज यांनी त्यांच्या, अभिनय कौशल्याचं, सौंदर्याचं आणि स्वभावाचं कौतुक केलं आहे. राज यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर, चाहत्यांकडून स्मिता पाटील यांना आदरांजली देखील वाहिली जात आहे. राज यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “स्मितामध्ये एक संवेदनशीलता होती. जरी तिचा जीवनप्रवास दुर्दैवाने कमी दिवसांचा असला तरीही, तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर एक ठसा उमटवला आहे. तिने फक्त वेगवेगळ्या भूमिका केल्या नाही तर, त्यामध्ये जीव ओतून काम केले आहे. खरं वाटेल अशा पद्धतीने आपलं काम केले आहे. मला तिची आठवण येतेय. तिचा प्रेमळ स्वभाव, दमदार अभिनय आणि तिला खास बनवणारी प्रत्येक गोष्ट आजही मला आठवतेय.”
View this post on Instagram
“स्मिताच्या जयंतीनिमित्त मला आज तिची प्रचंड आठवण येतेय. तिचा कलात्मक वारसा आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो, भावूक करतो आणि मनामध्ये घर निर्माण करून जातो. कलाकाराला जेव्हा देवाचं बोलावणं येतं, तेव्हा त्याला हे जग सोडून जावंच लागतं. पण स्मिताने तिच्या कारकिर्दित प्रत्येकाच्या मनामध्ये स्वत:ची एक विशेष जागा निर्माण केली आहे.”, अशी प्रतिक्रिया राज बब्बर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये लिहिली आहे. स्मिता पाटील यांच्या मुलगा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरनेही इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या लग्नामध्ये आईचा खास फोटो लावला होता. त्यासोबतचा फोटो शेअर केलेला आहे. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रतीक भावूक झाला होता.
https://www.prahaar.in/2026/10/18/nayyi-naveli-delivers-a-strong-performance-at-the-box-office-grosses-%e2%82%b910-3-crore-worldwide-in-two-days/
आज जरीही स्मिता पाटील हयात नसल्या तरीही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. वेगवेगळ्या शैलीचा अभिनय करत स्मिता यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनय कौशल्य, सौंदर्य आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे तिन्ही कौशल्य स्मिता यांच्याकडे असल्यामुळे स्मिता यांचं कौतुक संपूर्ण भारतीय कलाविश्व करतं.