Home ब्रेकिंग न्यूज Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

0
Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Entertainment News: अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात 4.6 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 5.7 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांतील चित्रपटाची एकूण जागतिक ग्रॉस कमाई 10.3 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/18/non-bailable-warrant-issued-against-rakhi-sawant-in-suicide-case-action-taken-due-to-her-absence-from-court/

फॅन्टसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा संगम

‘नई नवेली’ या चित्रपटात फॅन्टसी, अ‍ॅक्शन आणि कौटुंबिक भावनांचा संगम पाहायला मिळतो. प्राचीन महाकाव्यापासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात यामी गौतम एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. आवस्थी कुटुंबाभोवती फिरणारी कथा, अनपेक्षित वळणे आणि चांगल्या-वाईटातील संघर्ष यांमुळे चित्रपटाची चर्चा होत आहे.

दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. दुसऱ्या दिवशीच्या कमाईत झालेली वाढ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, आगामी दिवसांतील कमाईवरून चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.

चित्रपटात कोणते कलाकार?

या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी मोहन यांनी केले आहे. हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. यामी गौतमसह आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवर, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, संगीताची जबाबदारी जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सांभाळली आहे. अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर यलो यांच्या प्रस्तुतितील हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here