Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमधील ‘या’ रबडीवाल्यावर अन्न प्रशासनाची कारवाई, सीताफळाच्या पल्पमध्ये आढळल्या अळ्या

Nashik : नाशिकमधील ‘या’ रबडीवाल्यावर अन्न प्रशासनाची कारवाई, सीताफळाच्या पल्पमध्ये आढळल्या अळ्या

0
Nashik : नाशिकमधील ‘या’ रबडीवाल्यावर अन्न प्रशासनाची कारवाई, सीताफळाच्या पल्पमध्ये आढळल्या अळ्या

Nashik : नवीन नाशिकमधील पाटीलनगर परिसरातील प्रसिद्ध श्री राम रबडीवाला या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळल्याने प्रशासनाने संबंधित दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. तपासणीदरम्यान स्वच्छतेसह अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत तपासणी

अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गदेव आणि संकेत येलमामे यांनी संबंधित आस्थापनेची तपासणी केली. या तपासणीत रबडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळून आल्याची माहिती समोर आली.तसेच, आस्थापनेतील स्वच्छतेबाबतही त्रुटी आढळल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलत दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले.

https://www.prahaar.in/2026/10/17/nashik-tcs-case-storm-in-nida-khans-married-life-application-for-divorce-from-husband-family-court-submission/

अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी आहे. अन्नपदार्थ तयार करताना तसेच त्यांची साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करताना स्वच्छतेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य

या कारवाईमुळे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागरिकांनीही खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत संशय आल्यास नागरिकांनी संबंधित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here