Home महाराष्ट्र ठाणे Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

0
Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?
फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. पाट बंधारा विभागाने महापालिकांना पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सोमवारी (12 ऑक्टोबर) आठवड्यातील प्रत्येक गुरूवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ताजा असताना आता ठाणे महापालिकेने 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/14/bmc-additional-municipal-commissioner-abhijeet-banagar-inspects-jvpd-flyover-when-will-it-be-opened-for-the-service-of-mumbaikars/

ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये MIDC मार्फत होणारा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. आज रात्रीच पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस, अलनिनो प्रभाव आणि ऑक्टोबर 2026 पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा गुरूवार 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपासून ते शुक्रवार 16 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचा निर्णय, ठाणे महानगर पालिकेने काही तासांपूर्वीच घेतला आहे. महापालिकेने घेतलेल्या ह्या अचानक निर्णयामुळे ठाणेकरांना पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकांतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 आणि 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या परिसरामध्ये पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरळित झाल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण दिवस शटडाऊन असणाऱ्या परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान, पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/14/memorial-for-dr-br-ambedkar-is-to-be-constructed-in-thane-district-deputy-speaker-legislative-assembly-anna-bansode-has-directed-that-a-proposal-for-the-memorials-construction-be-submitted/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here