Home ब्रेकिंग न्यूज BMC Toilet Charges : आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ

BMC Toilet Charges : आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ

0
BMC Toilet Charges : आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ
आता लघुशंकेसाठीही पैसा मोजा, सार्वजनिक शौचालयाच्या विद्यमान शुल्कांत होणार वाढ (Google Photo )

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील पे अँड युज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सेवा लवकरच महाग होणार आहे. मुंबई महापालिकेने सध्या मोफत असलेल्या मुतारीसाठी १ रुपया शुल्क लावण्याचा आणि इतर सुविधांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मांडला जाणार आहे. यामध्ये शौचालयाचे शुल्क २ वरून ५ रुपये आणि स्नानगृहाचे शुल्क ५ वरून १० रुपये केला जाणार आहे.

मुंबईत ८४६ “पे-अँड-यूज” सार्वजनिक शौचालय असून या शौचालयांच्या चालकांनी देखभालीच्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर ही दरवाढ महापालिकेने प्रस्तावित केली आहे. सार्वजनिक शौचालयांची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली असली तरी याचे व्यवस्थापन खासगी संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडे आहे.

https://www.prahaar.in/2026/10/13/riyadh-attack-impact-indigo-akasa-international-flights-suspended-october-17/

सध्या मुतारीचा वापर निशुल्क तथा मोफत आहे, तर शौचालयासाठी २ रुपये आणि स्नानगृहासाठी ५ रुपये लागतात. तर प्रस्तावित बदलानुसार तिन्ही दर वाढतील आणि मुतारी ही प्रथमच सशुल्क होईल. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शौचालयांची स्वच्छता आणि निगा खासगी संस्थामार्फत राखली जाते. त्यावरील व्यवस्थापन खर्च वाढत आहे. चालकांना वाढता देखभाल खर्च पेलता यावा, याकरता त्यांच्या मागणीनुसार ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आला आहे.

ही वाढ फक्त सार्वजनिक पे-अँड-यूज शौचालयांना लागू होईल, तर सामुदायिक शौचालयांचे शुल्क कदाचित तसेच राहील. मुंबईत सुमारे ८,१७३ सामुदायिक शौचालय आहेत, त्यापैकी ३,११०ची देखभाल महापालिका करते.

मुंबईत कामाधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या आणि बदलत्या जीवन शैलीमुळे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लघुशंकेसाठी वारंवार जावे लागते. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयांचा आधार असतो. परंतु, आता ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये मुतारीकरता एकही पैसा मोजावा लागत नव्हता, तिथे आता एक रुपया मोजावा लागणार आहे. मुंबईत आजवर अनेकदा सार्वजनिक शौचालयांचे शुल्क वाढवण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रत्येक वेळी मुतारीची सेवा निशुल्क तथा मोफतच देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मुतारीकरता प्रस्तावित १ रुपयांचे प्रशासनाला मागे घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here