अफगाणिस्तान आणि बांगलादेश कसोटीचा निकाल लागणार अशी स्थिती चौथ्या दिवसापर्यंत होती. बांगलादेशने चौथ्या दिवसापर्यंत मजबूत पकड मिळवली होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पहिल्या डावात 346 धावा केल्या. तसेच या धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तान संघाला 240 धावांवर गुंडाळलं. पहिल्या डावात अफगाणिस्तानचा संघ 106 धावांनी पिछाडीवर होता. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या पुढे खेळताना बांगलादेशने आणखी 372 धावा जोडल्या आणि डाव घोषित केला. बांगलादेशने पहिल्या डावातील आघाडीसह 478 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं. त्यामुळे बांगलादेश हा सामना आरामात जिंकणार अशीच स्थिती होती. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने चौथ्या दिवशी 132 धावांवर तीन विकेट गमावले होते. त्यामुळे पाचव्या दिवशी अफगाणिस्तानचा संघ 347 धावांनी पिछाडीवर होता, तसेच सात विकेट काढून बांगलादेशचा विजय मिळण्याचा हेतू होता. पण तसं झालं नाही.
अफगाणिस्तानचा दुसरा डाव
विजयासाठी दिलेल्या 478 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 3 धावा असताना पहिला धक्का बसला. अब्दुल मलिक 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर शाहिदुल्लाह कमालची विकेट 28 धावा असताना पडली. त्यामुळे अफगाणिस्तानवर दडपण वाढलं.पण तिसऱ्या विकेटसाठी रहमत शाह आणि सेदिकुल्लाह अटल यांनी 82 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण संघाच्या 110 धावा असताना रहमत शाह बाद झाला. दुसऱ्या बाजूने सेदिकुल्लाह अटलने किल्ला लढवला. इतकंच काय तर इक्रम अलीखिल, इसमत आलम, हशमतुल्लाह शाहिदी यांच्यासोबत भागीदारी करत डाव पुढे नेला. सेदिकुल्लाह अटलने332 चेंडूत 111 धावा केल्या आणि बाद झाला. त्याच्या या झुंजार खेळीमुळे बांगलादेशचा विजय दूर गेला. पण तळाच्या बॅटर्सनी चिवट खेळी केली. कैस अहमदने नाबाद 49 धावांची खेळी केली. तर यामिन अहमदजाई यांची साथ मिळाली.
https://www.prahaar.in/2026/10/13/aus-vs-sa-australia-defeated-south-africa-by-214-runs-in-the-first-test-team-india-to-benefit-regarding-the-world-test-championship-2027/
बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास म्हणाला की, ‘आम्हाला सामना जिंकायचा आहे, पण क्रिकेट असेच चालते. अफगाणिस्तान खूप छान खेळला. खेळपट्टी थोडी सपाट असली तरी, ज्याप्रकारे त्यांनी चांगली फलंदाजी केली.’ सामना अनिर्णित राखण्यासाठी अफगाणिस्तानने केलेला हा एक शानदार बचावात्मक प्रयत्न होता. बांगलादेश खरं तर विजयाचा प्रबळ दावेदार होता, पण महत्त्वाच्या क्षणी झेल सोडले आणि क्षेत्ररक्षणाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.