Home फोटो गॅलरी ब्रँडेड की बजेट फ्रेंडली? सारा तेंडुलकरच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा; किंमत पाहून म्हणाल, ‘मी पण घेणार!’

ब्रँडेड की बजेट फ्रेंडली? सारा तेंडुलकरच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा; किंमत पाहून म्हणाल, ‘मी पण घेणार!’

0
ब्रँडेड की बजेट फ्रेंडली? सारा तेंडुलकरच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा; किंमत पाहून म्हणाल, ‘मी पण घेणार!’

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही तिच्या ग्लॅमरमुळे नेहमी चर्चेत असते. साराने आपला २९ वा वाढदिवस काल म्हणजेच १२ ऑक्टोबरला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी आकर्षण ठरलं ते म्हणजे तिचा झेब्रा प्रिंट ड्रेस. या ड्रेसवरचे फोटोज साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फुलांच्या नक्षीने सजलेला केक, रंगीबेरंगी फुगे आणि मित्रांच्या सहवासात घालवलेले खास क्षण साराने इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केले. वाढदिवसाच्या सजावटीने लक्ष वेधून घेतले असले तरी तिचा साधा पण तितकाच आकर्षक असा झेब्रा प्रिंट ड्रेसदेखील आकर्षण ठरला.
कोणताही महागडा किंवा शिमर ड्रेस निवडण्याऐवजी साराने झेब्रा प्रिंटचा मिडी ड्रेस निवडला. या ड्रेसला समोरच्या बाजूला बोट नेकलाईन होती आणि मागे ड्रेप डिटेलिंग असलेली बॅक होती. ड्रेसच्या लांब आणि पारदर्शक बेल स्लीव्हजमुळे या प्रिंटला एक नाजूक स्पर्श मिळाला होता, तर मनगटाजवळ असलेल्या टाय फास्टनिंग डिटेल्समुळे हे डिझाइन अधिकच उठून दिसत होते.
हा ड्रेस हलक्या वजनाच्या ट्यूलपासून बनवला होता, ज्यात ९३% पॉलिस्टर आणि ७% इलास्टेन होते. त्याला कॉन्ट्रास्ट रंगाचे अस्तर होते जे ड्रेसच्या पारदर्शकतेला साजेसे होते.
साराने स्टायलिंगमध्ये देखील साधेपण ठेवले होते. कानात तिने सिल्व्हरचे गोल कानातले, बोटात अंगठ्या आणि काळ्या रंगाचे स्ट्रॅपी फ्लॅट्स घातले होते. यामुळे तिचा लूक आधी उठून दिसत होता. साधेपणात सौंदर्य याचं उत्तम उदाहरण साराने चाहत्यांना दिलं आहे.
मेकअपच्या बाबतीत देखील साराने अगदी साधेपणा दाखवला. तिने गालाला ब्लश, न्यूड रंगाचा आयशॅडो, मस्कारा, आयलायनर आणि हायलायटरसह ग्लोइंग बेसचा वापर केला होता. न्यूड ग्लॉसी लिपस्टिकने तिचा मेकअप पूर्ण झाला. तसेच तिने केस मोकळे सोडले होते.
साराने घातलेला हा ड्रेस ‘झारा’ चा असून याची किंमत फक्त २५०० ते २८०० च्या दरात आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये आकर्षक ड्रेसच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here