Home क्रीडा आता अशा पद्धतीने आऊट झाला तर बोल्ड नाही, क्रिकेटचा नियम बदलला, काय ते नीट समजून घ्या

आता अशा पद्धतीने आऊट झाला तर बोल्ड नाही, क्रिकेटचा नियम बदलला, काय ते नीट समजून घ्या

0
आता अशा पद्धतीने आऊट झाला तर बोल्ड नाही, क्रिकेटचा नियम बदलला, काय ते नीट समजून घ्या
आता अशा पद्धतीने आऊट झाला तर बोल्ड नाही, क्रिकेटचा नियम बदलला, काय ते नीट समजून घ्या (Photo: ANI)

क्रिकेट खेळाने गेल्या काही वर्षात बरीच कात टाकली आहे. क्रिकेटचं स्वरूप आणि नियम यांच्यात खेळानुरूप सकारात्मक बदल होत गेले. त्या नियमांची यशस्वीरित्या अमलबजावणीही झाली आहे. आता असाच एक नियम बदलला गेला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हा नियम म्हणजे बोल्ड अर्थात त्रिफळाचीतचा… क्रिकेट नियमावली तयार करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने बोल्डबाबत एक नियम बदलला आहे. एमसीसीचे अध्यक्ष फ्रेजर स्टीवर्ट यांनी व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली. जर खेळाडूने नॉन स्ट्राईक एन्डच्या दिशेने जोरात मारला. तिथे स्टम्पवर चेंडू लागला आणि पुन्हा आपल्या दिशेने आणि स्ट्राईकला असलेल्या स्टम्पवर आदळला तर त्रिफळाचीत म्हणून घोषितक केलं जायचं. पण आता तसं होणार नाही. आता खेळाडूला त्रिफळाचीत बाद म्हणून दिलं जाणार नाही.

काय आहे नियम स्टीवर्ट यांच्या भाषेत

एमसीसी अध्यक्ष फ्रेजर स्टीवर्ट यांनी सांगितलं की, ज्युनिअर काउंटी सामन्यात एका फलंदाजाने शॉट्स खेळला. हा चेंडू नॉन स्ट्राईकर एन्डला असलेल्या स्टम्पवर जोरात लागला. त्यानंतर हा चेंडू त्या स्टम्पला लागून रिव्हर्स खेळाडूच्या दिशेने घरंगळत आला.तेव्हा फलंदाजाचं लक्ष नव्हतं. हा चेंडू स्ट्राईकला असलेल्या स्टम्पवर जोरात लागला आणि बेल्स पडल्या. त्यामुळे त्याला त्रिफळाचीत दिलं गेलं. क्रिकेटच्या जुन्या नियमानुसार खेळाडू त्रिफळाचीत होता. पण आता या नियमात बदल केला आहे. आता असा प्रकार घडला तर बाद दिलं जाणार नाही. खरं तर अशा पद्धतीने बाद होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण शक्यता पाहता एमसीसीने या नियमात बदल केला आहे.

https://www.prahaar.in/2026/10/13/shubman-gill-honored-with-the-icc-player-of-the-month-award-for-the-fifth-time-while-shafali-verma-also-received-the-honor1065922/

एमसीसीने या नियमातही केला बदल

एमसीसीने क्रिकेटच्या नियमात अनेक बदल केले आहेत. या नियमाची 1 ऑक्टोबर 2026 पासून अमलबजावणी केली जात आहे. फलंदाजाने चेंडू खेळण्यास जाणीवपूर्वक उशीर केला तर त्याला दोन वेळा समज दिली जाईल. पण तिसऱ्यांदा तीच चूक केली तर पाच धावा पेनल्टी म्हणून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिल्या जातील. दोन कर्णधारांच्या सहमतीने कसोटीत पिंक बॉल वापरण्याची परवानगी असले. कसोटी सामन्याच्या दिवसाच्या शेवटच्या षटकात कोणी फलंदाज आऊट झाला तर खेळ तिथेच थांबवला जाणार नाही. तर नवा फलंदाज फलंदाजीला येईल. असे अनेक नियम एमसीसीने बदलले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here