नवी दिल्ली : सध्या सणासुदीचा काळ सुरू असताना, यूपीआय (UPI) द्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि दुकानदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याबाबतचे नवीन नियम तूर्तास दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. यूपीआय आणि सर्व्हिस स्टीयरिंग समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, आता विशिष्ट दुकानदारांना आणि व्यावसायिकांना होणाऱ्या यूपीआय पेमेंटवर ‘एमडीआर’ (MDR) हा कर किंवा शुल्क दिवाळी संपल्यानंतरच लागू केला जाणार आहे. मात्र, हा नियम नेमका कधीपासून लागू होईल, याची अचूक तारीख अद्याप समोर आलेली नाही, त्याबाबत लवकरच वेगळी घोषणा केली जाईल.
https://www.prahaar.in/2026/10/13/raigad-shed-collapse-2025-workers-feared-trapped-or-injured-after-warehouse-construction-site-structure-crumbles-in-mankivali-3-critical-video/
दिवाळीच्या खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही
या निर्णयामुळे फेस्टिव्ह सीजनमध्ये म्हणजेच दिवाळीच्या खरेदीदरम्यान ग्राहकांना किंवा दुकानदारांना यूपीआय पेमेंटवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काचा किंवा बदलांचा सामना करावा लागणार नाही. अगदी सुरळीतपणे ग्राहक पूर्वीप्रमाणेच गुगल पे, फोन पे किंवा इतर यूपीआय ॲप्सद्वारे पैसे देऊ शकणार आहेत. मात्र, हा सणाचा काळ संपल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी आणि दुकानदारांसाठी हे नवे नियम खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण त्यानंतर व्यवहारांच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे.