Home फोटो गॅलरी शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

0
शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत
आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शुभमन गिलला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत अभिषेक शर्मा आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू कर्णधार सिकंदर रजा याचंही नाव होतं.पण या दोघांना मागे टाकत त्याने हा पुरस्कार पटकावला आहे. (Photo: ANI)
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारताच्या 11 पुरूष क्रिकेटपटूंनी हा पुरस्कार नावावर केला आहे. या 11 खेळाडूंमध्ये सर्वाधिक पाच वेळा पुरस्कार जिंकण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. (Photo: ANI)
जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी हा पुरस्कार प्रत्येकी 2 वेळा जिंकला आहे. तर ऋषभ पंत, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी एकदा या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. (Photo: ANI)
शुभमन गिलने पाचव्यांदा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरविण्यात आलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने द्विशतक आणि शतक ठोकलं होतं. यासह पहिल्या दोन वनडे सामन्यात 333 धावा केल्या होत्या. (Photo: ANI)

 

शुभमन गिलला पुरूष आयसीसी प्लेयर ऑफ पुरस्काराने गौरविण्यात आलं. तर भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्मा हीचा आयसीसी पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. महिला आयसीसी प्लेयर ऑफ द पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. (Photo: ANI)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here