Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News: मुंबईत सुरू होणार ‘पेटकेअर’ प्रशिक्षण संस्था, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Mumbai News: मुंबईत सुरू होणार ‘पेटकेअर’ प्रशिक्षण संस्था, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

0
Mumbai News: मुंबईत सुरू होणार ‘पेटकेअर’ प्रशिक्षण संस्था, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य आणि संगोपनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेच्या धर्तीवर मुंबईतही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी दिली. त्याचबरोबर राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पेटकेअरविषयक विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे लोढा यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/12/the-seashore-at-worli-koliwada-is-now-clean-approximately-%e2%82%b942000-will-be-spent-daily-on-cleanliness/

मुंबईत ही संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या लिंकवर आपली मते, सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन लोढा यांनी केले आहे. पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (पीईटीई) या उपक्रमांतर्गत पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य देत आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पेटकेअर क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, या क्षेत्रात कार्यरत असलेले व्यावसायिक तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करणारे नागरिक यांच्यासाठी विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे लोढा म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/10/12/unauthorized-construction-at-the-municipal-corporations-dadar-hawkers-plaza-permanent-stalls-actually-built-underneath-the-staircase/

या प्रशिक्षणामध्ये पाळीव प्राण्यांना हाताळणे, त्यांना फिरायला नेणे, त्यांच्या देखभालीसाठी व्यक्ती उपलब्ध करून देणे, पेट ग्रूमिंग तसेच पाळीव प्राण्यांसाठी निवास आणि देखभाल सुविधा व्यवस्थापन या विषयांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. याशिवाय पाळीव प्राण्यांचे संगोपन करणाऱ्या नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्याची, काळजीची आणि कल्याणाची माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here