Home महाराष्ट्र नवी मुंबई Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती

Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती

0
Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

कर्जत: कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील प्रवासी लोकलच्या प्रतिक्षेत आहेत. आता लवकरच या मार्गावरील प्रवाशांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या डिसेंबर 2026 पर्यंत कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिका पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टीने पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. कर्जत- पनवेल मार्गावर पहिल्या टप्प्यात 50 लोकल धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. नेमकी कशा पद्धतीने ही लोकल सेवा आहे, जाणून घेऊया…

https://www.prahaar.in/2026/10/12/the-seashore-at-worli-koliwada-is-now-clean-approximately-%e2%82%b942000-will-be-spent-daily-on-cleanliness/

डिसेंबर 2026 पासून कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असून डिसेंबरपासून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर जलद आणि सोयीस्कर होणार आहे. डिसेंबर 2026 पासून रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. 2 हजार 782 रूपये खर्च करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयुटीपी- 3 अंतर्गत कर्जत- पनवेल मार्गिकेवर काम केले जात आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर कर्जत- पनवेल मार्गिकेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/12/unauthorized-construction-at-the-municipal-corporations-dadar-hawkers-plaza-permanent-stalls-actually-built-underneath-the-staircase/

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत- पनवेल मार्गिका येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप तारीख समोर आलेली नसून प्रवाशांच्या दृष्टीने लवकरात लवकर कर्जत- पनवेल मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावर पहिल्या टप्प्यामध्ये 50 लोकल धावणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये रेल्वेकडून 12 डब्ब्यांच्या लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेकडून 15 डब्ब्यांच्या लोकलचा आणि एसी लोकलचा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. कर्जत- पनवेल मार्गावरील काम सध्या 99 टक्के पूर्ण झाले असून त्या दृष्टीने रेल्वेकडून पुढच्या उपाययोजना आखल्या जात आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/12/healthcare-facilities-including-municipal-hospitals-under-the-ppp-model/

दरम्यान, कर्जत- पनवेलदरम्यान दुहेरी रेल्वे मार्गिकेवर कर्जत, चौक, पोयंजे, चिखले आणि पनवेल अशी 5 स्थानके उभारण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वेकडून 3 बोगदे, 5 उड्डाणपूल आणि 16 भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत. 29.6 किलोमीटर लांबीच्या ह्या मार्गिकेवर 3.164 किमीवर 3 बोगदे आहेत. त्यामध्ये 2.625 किमी लांबीचा वावर्ले बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वेतील सर्वात लांब बोगदा आहे. कर्जत- पनवेल मार्गिकेसाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हा प्रवास फार खर्चिक आणि वेळखाऊ होता. पण आता ही रेल्वे मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here