मुंबई : काल 11 ऑक्टोबर रोजी, अमिताभ बच्चन यांनी आपला 84 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. अजून ही चाहत्यांचा प्रेमासाठी वेगवेगळ्या माध्यमातून बिग बी चाहत्यांसमोर येत असतात. 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ , ‘अमर अकबर अँथनी’ , ‘डॉन’, ‘मुक्कडर का सिकंदर’ , ‘अग्नीपथ’ , ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. आपल्या पहाडी आवाजाने, अभिनयाने आणि पडद्यावरील प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ ही ओळख मिळवून दिली. पुढे ‘बिग बी’ हे नाव त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक बनले. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना चाहते प्रेमाने ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाते. विशेषतः 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृत्युदाता’ चित्रपटानंतर या नावाने त्यांना नवीन ओळख मिळाली. ‘कोण बनेगा करोडपती’ , ‘बिग बॉस ३’, ‘आज कि है रात जिंदगी’ यांसारखे सुप्रसिद्ध कार्यक्रम त्यांनी केले आणि या कार्यक्रमातून चाहत्यांची मने जिंकली. त्यांचा चालू असलेला कार्यक्रम म्हणजेच “कोण बनेगा करोडपती (भाग- १८)” त्यांचा सूत्रसंचलनामुळे ते चाहत्यांची मने जिंकत असून कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळत आहे.( AMITABHA BACHCHAN)
https://www.prahaar.in/2026/10/10/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-starrer-kapuskoonda-marathi-movie-teaser-release/
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी जमली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचे भरभररून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी लाल रंगाचा कुर्ता घातला होता. चाहत्यांकडून प्रेम आणि आशिर्वाद घेत असताना काही लहान मुलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन अमिताभ बच्चन यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. याचदरम्यान एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तिला हात मिळवण्यासाठी नकार दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. वाढदिवशी चाहतीला अमिताभ बच्चन यांनी हात मिळवण्यासाठी नकार दिल्यामुळे ते सध्या सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहेत.( BIG-B)
https://www.prahaar.in/2026/10/11/madhuri-dixit-shared-her-mother-advice-on-facing-negativity-during-career-starting-days/
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांच्या भेटीसाठी जमले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी घराबाहेर येऊन चाहत्यांचे भरभररून आशीर्वाद घेतले. चाहत्यांना अभिवादन करत असताना काही लहान मुलांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पुढे जाऊन अमिताभ बच्चन यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. याचदरम्यान एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.(CNTROVERSY)
View this post on Instagram
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मते पाहायला मिळत आहेत. काही नेटकऱ्यांनी महिला चाहती मोठ्या अपेक्षेने आली होती, त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते, असे मत मांडले. दुसरीकडे, काहींनी कलाकारांच्या वैयक्तिक बाबींचा आदर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरक्षा व्यवस्था ओलांडून कलाकारांजवळ जाण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचेही काही नेटकऱ्यांनी सांगितले आहे. बिग बी यांच्या वाढदिवसा निमित्त बॉलिवूड इंडस्ट्रीतून चिरंजीवी, काजोल, संजय दत्त, प्रभास, कमल हसनसह अनेक कलाकारांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस खास केला. बिग बी ना हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतून भरभरून प्रेम मिळताना दिसून आले.
https://www.prahaar.in/2026/10/11/ramayana-movie-lara-dutta-as-a-kaikeyi-and-sheeba-chaddha-as-a-manthara-charcter-poster-released-on-social-media/