भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 14 धावांनी पराभूत केलं. भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केलं आणि मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. असं असलं तरी वेस्ट इंडिजने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: ANI)तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी एकूण 13 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात वेस्ट इंडिजचे 2000 षटकार पूर्ण झाले आहेत. अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिज हा जगातील पहिला संघ ठरला आहे.दोन वेळा टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: ANI)तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक षटकार मारण्याची स्पर्धा सुरू होती. कॅरेबियन फलंदाजांनी या सामन्यात 13 षटकार मारत 2000 षटकारांचा पल्ला गाठला. (Photo: ANI)भारतीय संघ षटकारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 1997 षटकार मारले आहे. आता चौथ्या टी20 सामन्यात भारताने तीन षटकार मारले तर 2000 षटकारांचा पल्ला गाठणारा दुसरा संघ ठरेल. (Photo: ANI)टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज संघआच्या आसपास कोणी नाही. या यादीत तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा सघ आहे. न्यूझीलंडच्या नावावर 1585 षटकार आहेत. म्हणजेच भारत आणि वेस्ट इंडिज संघ खूप पुढे निघून गेला आहे. (Photo: ANI)