Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather : घामाच्या धारा आणि उकाड्याने महाराष्ट्र तापला,उष्णतेमुळे नागरिक हैराण!

Maharashtra Weather : घामाच्या धारा आणि उकाड्याने महाराष्ट्र तापला,उष्णतेमुळे नागरिक हैराण!

0
Maharashtra Weather : घामाच्या धारा आणि उकाड्याने महाराष्ट्र तापला,उष्णतेमुळे नागरिक हैराण!

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यासाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नसला, तरी वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ शकतो.

https://www.prahaar.in/2026/10/11/nashik-trimbakeshwar-set-for-a-facelift-through-kumbh-mela-development-works-chief-minister-fadnavis-conducts-an-inspection/

कोकण विभागात मागील दिवशी उष्णतेचा यलो अलर्ट होता. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी या भागासाठी कोणताही विशेष अलर्ट नसल्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 36 अंश, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा त्रास जाणवू शकतो.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पश्चिम महाराष्ट्रातही उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहू शकते. या भागात कमाल तापमान 35 ते 37 अंश, तर किमान तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत पाणीटंचाईची समस्याही कायम आहे.

विदर्भातही ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत आहे. पुढील 4 ते 5 दिवस या भागात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 ते 34 अंश, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

दरम्यान, वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे, हलके कपडे वापरावेत आणि उन्हात बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here