Home ब्रेकिंग न्यूज कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

0
कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी
कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी (Photo: @CMOMaharashtraX Account)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या कामांमुळे दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ, गोदाघाट, नाशिकमधील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळावरील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, पुढील 25 ते 30 वर्षांच्या विकासाचा पाया मजबूत करणारी ठरणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहून ही कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

द्वारका सर्कल, त्र्यंबकेश्वर आणि विमानतळ विस्तारीकरणावर भर

त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा विकसित केल्या जात आहेत. तेथील दर्शनपथ आणि गोदाघाटाची आव्हानात्मक कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. दुसरीकडे, नाशिकमधील द्वारका सर्कलचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, यंदाच्या पावसाळ्यात तेथे पाण्याचा निचरा सुरळीत होण्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. याशिवाय, ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि आगामी काळात येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/10/11/state-government-in-action-mode-for-drought-relief-chief-minister-devendra-fadnavis-focuses-on-planning-for-food-and-fodder/

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून परिवर्तनात्मक विकास

कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाचा मेगा प्लॅन यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका, एमएसआरडीसी, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा व पोलीस प्रशासन या सर्व यंत्रणा एकत्रित संघ म्हणून समन्वयाने काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व विभागांच्या कामगिरीचे, विशेषतः एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या कामांचे कौतुक केले. या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, प्रा. देवयानी फरांदे, राहुल ढिकले, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ सनदी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here