Home नवरात्रौत्सव Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

0
Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर वर्षभरात चार नवरात्री असतात. चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ महिन्यात नवरात्री असतात. चैत्र नवरात्रीला वासंती नवरात्री, आषाढ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्री, अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्री, तर माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हंटलं जातं. या चारही नवरात्री एकमेकांपेक्षा वेगळ्या आहे. गुप्त नवरात्रीत तांत्रिक, ऋषीमुनी आणि साधक मंडळी अत्यंत कडक आणि गुप्त पद्धतीने देवीची साधना करतात. पण आज आपण शारदीय आणि चैत्र नवरात्रीत नेमका काय फरक आहे ते समजून घेऊयात. या दोन्ही नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रुपांचं पूजन केलं जातं. पण शारदीय आणि चैत्र नवरात्रीत फरक आहे. दोन्ही नवरात्रींचा उद्देश, श्रद्धा आणि उत्सवाचा समारोप वेगवेगळा असतो.

शारदीय नवरात्री का साजरी केली जाते?

शारदीय नवरात्री अश्विन महिन्यात साजरी केली जाते. भाद्रपद महिना संपल्यानंतर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीची घटस्थापना केली जाते. देवी दुर्गेचा नऊ दिवस धार्मिक उत्सव साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या कालावधीत देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे या कालावधीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा केला जातो. या काळात देशांच्या अनेक भागात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

चैत्र नवरात्रीत काय होतं?

चैत्र नवरात्रीपासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. या काळात नऊ दिवस भाविक मोठ्या श्रद्धेने देवीची उपासना करतात. गुढीपाडव्यापासून नवरात्रीला सुरूवात होते. तर या नऊ दिवसांची सांगता रामनवमीने होते. कारण या नवव्या प्रभू रामचंद्रांची जयंती असते. त्यामुळे देवीच्या शक्तीच्या पूजेसोबत भगवान विष्णूच्या अवतार असलेल्या प्रभू रामचंद्राची पूजा होते. त्यामुळे चैत्र नवरात्रीचं महत्त्व आहे.

उपासनेत काय फरक?

दोन्ही नवरात्री उत्सवात देवींची पूजा होते. त्यामुळे यात काही फरक नाही. देवींच्या नऊ रुपांचं पूजन केलं जातं. चैत्र नवरात्रीत उपवास, ध्यान आणि आध्यात्मिक शिस्तीवर विशेष भर दिला जातो. तर शारदीय नवरात्रीत दुर्गापूजेच्या उत्सवासोबत सार्वजनिक आयोजन केलं जातं. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक राज्यात चैत्र नवरात्रीचं महत्त्वं आहे. तर शारदीय नवरात्री गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसंच पाहिलं तर दोन्ही नवरात्रीत ऋतुही वेगळे असतात. चैत्र नवरात्री वसंत ऋतूत येते, तर शारदीय नवरात्री पावसाळ्यानंतर, शरद ऋतूच्या आगमनाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते.

(Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याची पुष्टी करत नाही. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here