मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पटौदी हिने अलीकडेच तिच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. तिच्या शॉकिंग खुलासाने अख्ख बॉलिवूड अचंबित झालंय. वयाच्या 27 व्या वर्षी सबाला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले असल्याचे तिने सांगितले. सोहा अली खानच्या ‘ऑल अबाऊट हर’ या पॉडकास्टमध्ये तिची बहिण सबा अली खान आणि डॉ. माजदा तुरेल सहभागी झाले होते. यावेळी दोघींनीही पॉडकास्ट एपिसोडमध्ये चाहत्यांना ब्रेन ट्यूमर कसा रोखायचा आणि निरोगी मेंदू कसा ठेवायचा यावर चर्चा केली.
https://www.prahaar.in/2026/10/09/drishyam-3-movie-bollywood-actor-ajay-devgn-become-first-to-give-3-hits-after-covid-19-drishyam-2-and-shaitaan/
ज्वेलरी डिझायनर सबाने सांगितले की, वयाच्या 27 व्या वर्षी तिला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. तिच्या मेंदूवर 2006 साली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सबासोबत घडलेली घटना ऐकूण फक्त चाहतेच नाही तर, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत.ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यानंतरचा किस्सा सांगताना सबा अली खानने सांगितले की, “एक दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर होते, त्यावेळी मी अचानक बेशुद्ध होऊन कोसळले. त्यावेळी माझी तब्येतही ठीक नव्हती. मला वाटले की हे पोटाच्या त्रासामुळे झाले असावे.याआधी मी अशा पद्धतीने केव्हा बेशुद्ध झाले नव्हते. त्यावेळी मला खूप अस्वस्थ वाटत होते. बेशुद्ध होणं म्हणजे, माझ्यासाठी, ब्लडप्रेशर कदाचित हाय किंवा लो झाला असणंच आहे.”
https://www.prahaar.in/2026/10/10/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-starrer-kapuskoonda-marathi-movie-teaser-release/
सबाच्या लक्षात आले की तिची प्रकृती ठीक नाही. उठून शुद्धीवर येण्याआधीच ती पुन्हा बेशुद्ध झाली. ती म्हणाली, “मी पुन्हा पूर्णपणे बेशुद्ध झाले. मला खूप भीती वाटत होती.” सबाने सांगितले की तिला शुद्धीवर येण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागली. “तेव्हाही माझं डोकं व्यवस्थित नव्हतं” त्यानंतर तिच्या मेंदूच्या MRI ची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये तिच्या मेंदूच्या तिसऱ्या व्हेंट्रिकलमध्ये एक ठिपक्यासारखा भाग आढळून आला. डॉक्टरांनी दिलेल्या काही चाचण्या दिल्यानंतर, सबाला कोलॉइड सिस्ट असल्याचे निदान झाले. निदानाच्या सहा महिन्यांनंतर सबावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टरांनी तिला पिलोसायटिक ॲस्ट्रोसायटोमा असल्याचे निदान झाले. हा आजार मेंदू किंवा पाठीच्या कण्यात होणारा आहे. जो हळूहळू वाढणारा आणि सहसा कर्करोग नसलेला ट्यूमर आहे. या आजाराची माहिती जेव्हा शस्त्रक्रिया सुरू असते, तेव्हा कळते, अशी माहिती सबाने पॉडकास्टमध्ये दिली.
https://www.prahaar.in/2026/10/10/bharat-jadhav-and-pushkar-shrotri-face-off-in-a-legal-battle-kon-yashwant-pansare-is-set-to-premiere-on-zee5-marathi/
2006 मध्ये आलेल्या हेल्थबद्दलच्या आपबितीबद्दल बोलताना सबा अली खान म्हणाली की, “त्यावेळी तिला सुन्न झाल्यासारखे वाटले होते. त्यानंतर मला केव्हाच बरं असल्या सारखं वाटत नव्हतं. एका दिवशी तुम्ही अगदी ठीक असता आणि दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सांगितले जाते की तुमची ब्रेन सर्जरी होणार आहे. हे अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेसारखे नसते. ही शस्त्रक्रिया तुम्हाला आतून मनाने संपूर्ण खचून टाकते, पण तितकंच ही शस्त्रक्रिया तुम्हाला अधिक मजबूत देखील बनवते. कारण तुम्हाला माहित असतं की तुम्हाला त्याचा सामना करायचा आहे. त्यामुळे तुम्ही मनाने धीट होता.” सबाने मुलाखतीच्या शेवटी सांगितले की, “त्या काळात मी खूप भावनिक चढ- उतारांमधून जात होती. मी अचानक रडायला लागायचे आणि मला कळत नव्हतं की असे का होत आहे. याचे कारण असेही होते की, मी त्या अनपेक्षित बातमीतून सावरण्याचा प्रयत्न करत होते.”