Home क्रीडा William O’Rourke : न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेतून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर; संपूर्ण संघात खळबळ

William O’Rourke : न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेतून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर; संपूर्ण संघात खळबळ

0
William O’Rourke : न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेतून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर; संपूर्ण संघात खळबळ
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतून विल्यम ओ'रॉर्क बाहेर (फोटो सौजन्य: ANI News)

क्राइस्टचर्च : आगामी भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंड संघाला एक अत्यंत वाईट बातमी मिळाली आहे. न्यूझीलंडचा प्रमुख आणि घातक वेगवान गोलंदाज विल्यम ओ’रॉर्क (William O’Rourke) दुखापतीमुळे भारता विरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून पूर्णपणे बाहेर झाला आहे. त्याच्या डाव्या मांडीचा (Hamstring) आणि पोटरीचा (Calf) स्नायू दुखावला असल्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खबरदारीचा मोठा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

डिसेंबरमधील ऑस्ट्रेलिया दौरा ठरला महत्त्वाचा

ओ’रॉर्कच्या तंदुरुस्तीला प्राधान्य देत न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने त्याला भारताविरुद्ध विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त करणे, हे संघाचे मुख्य लक्ष्य आहे. त्यामुळेच भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आले असून, मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनीही ही बाब संघासाठी निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/10/ravindra-jadeja-saurashtra-ranji-trophy-squad-new-zealand-series/

सततच्या दुखापतींनी पाठ सोडली नाही

विल्यम ओ’रॉर्क गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दुखापतींशी संघर्ष करत आहे. एप्रिल 2025 मध्ये पाठीच्या ‘स्ट्रेस फ्रॅक्चर‘मधून सावरल्यानंतर त्याने पुनरागमन केले होते. परंतु, जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या मांडीचा स्नायू फाटला (Tear), आणि त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस सरावादरम्यान त्याच्या पोटरीलाही दुखापत झाली. या सर्व कारणांमुळे त्याला क्रिकेटपासून लांब राहावे लागले आहे.

टी-20 मालिकेतही आधीच होता बाहेर

भारताविरुद्ध 22 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीही ओ’रॉर्कचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. तसेच, इतर खेळाडूंमध्ये मार्क चैपमन आणि जॅक फॉल्क्स हे देखील दुखापतीमुळे टी-20 संघातून बाहेर झाले असून, त्यांच्या जागी जोश क्लार्कसन आणि ब्लेअर टिकनर यांना संधी देण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर 1 नोव्हेंबरपासून 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल, तर त्यानंतर वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. अशात प्रमुख गोलंदाजाची अनुपस्थिती न्यूझीलंडसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here