Home ब्रेकिंग न्यूज Weather Update : मान्सून गेला, घाम फुटला! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; 5 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

Weather Update : मान्सून गेला, घाम फुटला! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; 5 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

0
Weather Update : मान्सून गेला, घाम फुटला! महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; 5 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी
फोटो सौजन्य: ANI News

मुंबई : राज्यातून परतीच्या मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर आता राज्यावर उष्णतेचे मोठे संकट ओढवले आहे. ऑक्टोबर महिन्यातच उन्हाचा पारा वेगाने चढू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून, 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

कुठे आहे ‘यलो अलर्ट’? आणि कसे आहे हवामान?

  • कोकण आणि मुंबई परिसर (यलो अलर्ट): पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण आणि दमट (Hot & Humid) हवामानाचा जोर वाढला असून या 5 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून दमट वातावरणामुळे नागरिकांना तीव्र त्रासाचा सामना करावा लागत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहणार असून कमाल तापमान 33°C आणि किमान तापमान 20°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

  • पश्चिम महाराष्ट्र: पुणे आणि सोलापूरमध्ये कोरडे हवामान असले, तरी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या सरी व मेघगर्जनेची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 32°C राहू शकते.

  • मराठवाडा व विदर्भ: पावसाची तूट आणि उघडीप यामुळे मराठवाडा व विदर्भात उष्ण व कोरडे हवामान कायम आहे. या दोन्ही विभागांत कमाल तापमान 34°C च्या आसपास नोंदवले जात असून, पावसाअभावी शेतकरी वर्गाची चिंता अधिकच वाढली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/09/bulldozers-raze-30-structures-affected-by-the-coastal-road-project-in-borivali-bmc-administration-carries-out-a-major-demolition-drive/

नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

परतीच्या पावसानंतर अचानक वाढलेली उष्णता आणि दमट वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. हवामान खात्याने नागरिकांना दुपारी कडक उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आणि पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाच्या लांबणीमुळे शेती पिकांवर ताण येत असल्याने बळीराजाची चिंताही वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here