आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयास भेट देऊन राज्यातील मत्स्यव्यवसाय व अॅक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ, मच्छीमार कल्याण तसेच एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीबाबत सविस्तर माहिती व आढावा घेण्यात आला. आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सागरी मत्स्यव्यवसाय, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि अॅक्वाकल्चर क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.




