Home फोटो गॅलरी Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!

Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!

0
Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण गेल्या काही वर्षात पदकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असं असताना भारत या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे. पण भारतापुढे आव्हान असणार आहे. (Photo: ANI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक 2036 स्पर्धेचं आयोजन भारतात व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघ पूर्ण जोर लावत आहे. (Photo: ANI)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने ऑलिम्पिक 2036 साठी भारताचा दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण यजमानपदाच्या शर्यतीत इतर देशही आहेत. त्यामुळे हे आव्हान मोठं असणार आहे. (Photo: ANI)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने स्पष्ट केलं की, 2036 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतासह जर्मनी, दक्षिण कोरिया, दक्षिण अफ्रिका, हंगेरी, तुर्की आणि कतर हे देश शर्यतीत आहेत. यात जर्मनी आणि दक्षिण अफ्रिकेने स्पर्धेचं यजमानपद भूषवलं आहे. (Photo: ANI)
भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराचा दावा सादर केला आहे. हा दावा मजबूत करण्यासाठी भारताने 2030 चे कॉमनवेल्थ गेम्स अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: ANI)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here