Home फोटो गॅलरी IND vs WI: दुसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव विंडीजला फिरकीवर नाचवणार! रांचीतील रेकॉर्ड एकदा वाचा

IND vs WI: दुसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव विंडीजला फिरकीवर नाचवणार! रांचीतील रेकॉर्ड एकदा वाचा

0
IND vs WI: दुसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव विंडीजला फिरकीवर नाचवणार! रांचीतील रेकॉर्ड एकदा वाचा
भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ आता दुसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचे लक्ष्य असणार आहे. दुसरा सामना शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला जाईल. (Photo: ANI)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विजयाचा शिल्पकार कोण ठरणार? याची उत्सुकता आहे. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंवर खास करून लक्ष असेल. पण फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सामन्याचा निकाल बदलू शकतो. (Photo: ANI)
कुलदीप यादवने पहिल्या टी20 सामन्यात दोन विकेट काढल्या होत्या. आता रांचीमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. या मैदानावरील त्याचा विक्रम पाहता तो त्याहूनही चांगली कामगिरी करू शकतो, असं दिसतंय. (Photo: ANI)
कुलदीपने रांचीमध्ये भारतासाठी दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अत्यंत भेदक गोलंदाजी करत तीन विकेट काढल्या आहेत. एका सामन्यात त्याने चार षटकांत फक्त धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याने फक्त 16 धावा दिल्या. (Photo: ANI)
कुलदीपच्या विक्रमामागे जेएससीए स्टेडियमची खेळपट्टीदेखील कारणीभूत आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. यामुळेच कुलदीपने तीन वनडे सामन्यांमध्ये आठ बळी आणि एका कसोटी सामन्यात चार बळी घेतले आहेत. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here