Home क्रीडा बापरे! कॅच घेताना दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठा अपघात टळला Video

बापरे! कॅच घेताना दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठा अपघात टळला Video

0
बापरे! कॅच घेताना दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठा अपघात टळला Video
बापरे! कॅच घेताना दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठा अपघात टळला (Photo: Video Grab)

ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर असून वनडे मालिका सुरू आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना भारतीय खेळाडूंसोबत एक अपघात टळला. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजीला आल्यानंतर काही वेळातच विकेटची संधी चालून आली. विकेटकीपर प्रभसिमरन सिंह आणि खेळाडू निशांत सिंधु यांनी झेल पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र हा झेल पकडण्याच्या प्रयत्नात एकमेकांना धडकले. ही धडक खूपच जोरदार होती. त्यामुळे खेळाडू दुखापतग्रस्त झाले असतील, अशी भावना क्रीडाप्रेमींच्या मनात आली. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. दोन्ही खेळाडू सुखरूप होते आणि पुन्हा खेळाला सुरूवात झाली. हा प्रकार ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिल्या विकेट दरम्यान घडला. वेगवान गोलंदाज यश ठाकुरच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल ओवेन याने जोरदार फटका मारला. पण बॅटची किनार लागल्याने चेंडूवर वर चढला.

झेल पकडताना नेमकं काय घडलं?

मिचेल ओवेने मारलेला चेंडू वर चढल्याचं पाहून विकेटकीपर प्रभसिमरन सिंह आणि निशांत सिंधु यांनी धाव घेतली. प्रभसिमनरन सिंह स्टम्पच्या मागून पॉइंटच्या दिशेने वेगाने धावत गेला. तर निशांत सिंधु तिथेच फिल्डिंग करत असल्याने झेल पकडण्यासाठी तयार होता. पण या दरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांना कॉल देण्यास विसरले. दोन्ही खेळाडू चेंडूच्या बरोबर खाली आल्यानंतर त्यांची जोरदार धडक झाली. प्रभसिमरनने हा झेल पकडला, पण दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले. खरं तर त्याचं सुदैव म्हणून फार काही झालं नाही. पण यावेळी निशांत सिंधु मात्र नाराज दिसला. कारण हा झेल त्याच्या हातातला असूनही प्रभसिमरन धावत आल्याने त्याला काही कळलंच नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/06/sourav-ganguly-has-been-appointed-as-the-head-coach-of-the-delhi-capitals-team-for-the-ipl-2027-tournament/

प्रभसिमरन सिंहने हा झेल पकडल्यानंतर भारताच्या खात्यात पहिली विकेट आली. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या 23 धावा असताना पहिली विकेट पडली. मिचेल ओवेन 7 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अ (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, अनुकुल रॉय, अर्शद खान, यश ठाकूर.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ (प्लेइंग इलेव्हन): सॅम कॉन्स्टास, मिचेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकीपर), नॅथन मॅकस्वीनी, लियाम स्कॉट, निखिल चौधरी, विल सदरलँड (कर्णधार), टॉड मर्फी, स्पेन्सर जॉन्सन, रायली मेरेडिथ, माहली बियर्डमन.


            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here