फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीत कौरने 10 वर्षे टीम इंडियाचे नेतृत्व केले. तिच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात 2016 मध्ये झाली.
फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीत कौर ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णधार आहे.
फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने चार वेळा आशिया कप जेतेपदावर नाव कोरलं.
फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीत कौर ही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक राखणारी पहिली कर्णधार आहे.
फोटो सौजन्य : ANI
भारतीय संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली यावर्षी जुलैमध्ये लॉर्ड्सवर आपला पहिला कसोटी सामनाही जिंकला.
फोटो सौजन्य : ANI
पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारी हरमनप्रीत कौर ही जगातील पहिली कर्णधार आहे.
फोटो सौजन्य : ANI
सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रमही हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवट 92 टी20 आंतरराष्ट्रीय विजयांसह केला.
फोटो सौजन्य : ANI
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 126 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यात चार कसोटी विजयांचा समावेश आहे.
फोटो सौजन्य : ANI
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
फोटो सौजन्य : ANI
2018 मध्ये, हरमनप्रीत कौर महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय ठरली.
फोटो सौजन्य : ANI