Home महाराष्ट्र नाशिक Nashik Accident : येवला-नांदगाव मार्गावर पहाटे काळाचा घाला ! ट्रकला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू

Nashik Accident : येवला-नांदगाव मार्गावर पहाटे काळाचा घाला ! ट्रकला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू

0
Nashik Accident : येवला-नांदगाव मार्गावर पहाटे काळाचा घाला ! ट्रकला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू

Nashik Accident : येवला-नांदगाव राज्यमार्गावर सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मालवाहतूक आयशरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आयशर चालक श्रीकांत चव्हाण (रा. लातूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मनोज राठोड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

https://www.prahaar.in/2026/10/06/series-of-accidents-on-the-missing-link-banana-laden-tempo-overturns-6-to-7-injured-in-bus-truck-collision/

नागरिकांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमींना नागरिकांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here