Home ब्रेकिंग न्यूज Vande Bharat Sleeper : मुंबई-बंगळूरु प्रवास होणार जलद; वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने रवाना

Vande Bharat Sleeper : मुंबई-बंगळूरु प्रवास होणार जलद; वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने रवाना

0
Vande Bharat Sleeper : मुंबई-बंगळूरु प्रवास होणार जलद; वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई : मुंबई आणि बंगळूरु दरम्यान जलद रेल्वे सेवेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून 16 डब्यांची स्लीपर रेक मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून ही रेक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे नेली जात आहे. (Indian Raliways)

लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

मुंबई आणि बंगळूर या शहरांदरम्यान लवकरच अतिवेगवान सेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे. याच महिन्याच्या अखेरीस वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा कंदील मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार असून 8 तास वाचणार आहेत.

मुंबई-बंगळूरु रेल्वे सेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि प्रवाशांची ये-जा असते. मात्र, सध्या या मार्गावर थेट रेल्वे पर्याय मर्यादित आहेत. उद्यान एक्सप्रेस ही दोन्ही शहरांदरम्यान धावणारी प्रमुख दैनंदिन सेवा असून, तिच्या प्रवासाला साधारण 22 ते 24 तास लागतात. (Vande Bharat Slepeer)

https://www.prahaar.in/2026/10/05/air-travel-to-get-costlier-during-the-peak-festive-season-indigo-has-significantly-hiked-fuel-surcharges/

गेल्या वर्षी 27 सप्टेंबर 2025 रोजी बंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी मुंबई-बंगळूरु दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आश्वासन मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही सेवा सुरू होण्यास विलंब झाला. आता वंदे भारत स्लीपरची रेक मुंबईच्या दिशेने हलवण्यात आल्याने ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.

प्रवाशांचा वेळ वाचणार

रेल्वे बोर्डाने बंगळूरु आणि मुंबईदरम्यान आठवड्यातून 6 दिवस वंदे भारत स्लीपर सेवा चालवण्यास तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती आहे. या ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी 16 तासांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे प्रवासाच्या तुलनेत प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकतो.

या मार्गावरून धावणार वंदे भारत

प्रस्तावित मार्ग अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याणमार्गे जाणार आहे. मात्र, ट्रेनचे अंतिम थांबे आणि अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. वेळापत्रकानुसार बंगळूरुहून रात्री सुटून ही ट्रेन मुंबईत दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच प्रवासाची निश्चित वेळ स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here