मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायणा’ चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. आज (05 ऑक्टोबर- सोमवार) दुपारी चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली होती. घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ही आगीची घटना घडली आहे. आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरले, ज्यामुळे फिल्म सिटीमध्ये घबराट पसरली होती. ‘रामायणा’ चित्रपटाचे चित्रीकरण आजसाठी थांबवण्यात आल्याची माहिती आहे. जरीही जीवितहानी झाली नसली तरीही सेटचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/05/sanjay-dutt-controversy-over-sanjay-dutts-remarks-on-silence-now-comes-a-clarification-he-says-there-was-no-intention-to-hurt-sentiments/
प्राथमिक माहितीनुसार, ‘रामायणा’ चित्रपटाच्या सेटवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची घटना घडली तेव्हा, सेटवर कोण कोण कलाकार होते, याची माहिती मिळालेली नाही. परंतू या आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीये. आगीची घटना घडताच प्रॉडक्शन टीमकडून सेट खाली करण्यात आला. आगीची घटना घडताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. नेमकं आगीच्या घटनेमध्ये निर्मात्यांचं किती कोटींचं नुकसान झाले आहे, ही माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायणा’ चित्रपट दोन भागामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे, तर चित्रपटाचा दुसरा भाग 2027 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटामध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं आहे. ‘रामायणा’वर आधारित चित्रपटासाठी चाहते कमालीचे आतुर आहेत. चित्रपटातील पहिलं गाणं गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. शिवाय, चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा जुलै महिन्यामध्ये रिलीज झाला होता. कदाचित फायनल ट्रेलर सुद्धा रिलीज होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतू चित्रपटाचा ट्रेलर रिलीज खूप दिवस झाले आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी चित्रपटाचा फायनल ट्रेलर येण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/10/05/megastar-anil-kapoor-wins-the-best-actor-award-for-the-film-subhedar-at-the-asian-academy-creative-awards/