Home महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण पण ग्राहकांना ग्राहकांना दिलासा नाही

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण पण ग्राहकांना ग्राहकांना दिलासा नाही

0
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण पण ग्राहकांना ग्राहकांना दिलासा नाही

जवळपास महिनाभर कांद्याने घाऊक बाजारात उच्चांकी दर गाठलेला असताना आता नाशिकमध्ये घाऊक कांद्याचे दर घसरले आहेत. कारण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून होणाऱ्या नवीन आवकेमुळे देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील दरांवरील ताण कमी झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला लासलगावमध्ये चांगल्या प्रतीचा कांदा घाऊक दरात ५५ रुपये प्रति किलो तर निकृष्ट कांदा हा ४५ रुपये प्रति किलोने विकला जात होता. आता महिन्याभरानंतर हे दर घसरले असून चांगल्या प्रतीचे दर ४६ रुपये तर निकृष्ट प्रतीचे दर ३५ रुपये प्रति किलोवर आले आहेत.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून कांद्याची उपलब्धता वाढल्यामुळे दरात घट झाली असल्याचे लासलगाव एपीएमसीच्या संचालकांनी सांगितले. कर्नाटकातील मंडईमध्ये सध्या घाऊक दर हे मालाच्या गुणवत्तेनुसार ३५ ते ५१ रुपये प्रति किलो इतके आहेत. मात्र हॉटेल उद्योगाकडून नाशिकच्या कांद्यांना असलेली मागणी मजबूत असल्याचे आणि लासलगावमधील दरांमध्ये आणखी लक्षणीय घट होण्याची शक्यता नसल्याचे देखील संचालकांनी त्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/05/committee-to-probe-current-and-former-mpsc-chairpersons-and-members-recommendation-for-action-under-article-317/

परदेशी खरेदीदारांकडून आंध्र आणि कर्नाटकच्या कांद्याला मागणी असल्याचे समजते. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये खरीप कांद्याची काढणी ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सुरु झाली. परदेशी खरेदीदार हे नव्याने काढलेल्या पिकाला जास्त पसंती दर्शवतात. या दोन राज्यांमधील कांदे नवीन असल्याने परदेशातून मोठी मागणी आहे. तर दुसऱ्या बाजूला लासलगावमध्ये दररोज ६००० क्विंटल कांद्यांची आवक होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घाऊक दरातील कांद्याच्या किंमती घटल्या असल्या तरी किरकोळ बाजारात कांद्यांचे दर हे ६५ रुपये प्रति किलोवर कायम आहेत. किरकोळ विक्रीसाठी खरेदी केलेल्या कांद्यांपैकी २० ते ३० टक्के नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांना साधारणपणे तोटा होतो. तज्ज्ञांकडून देखील घाऊक आणि किरकोळ दरातील तफावतीमागे किरकोळ बाजारात कांद्याचं होणारं नुकसान हेच कारण सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here