Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane in Amravati: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची आढावा बैठक; तलावातील गाळ काढण्याचे निर्देश

Nitesh Rane in Amravati: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची आढावा बैठक; तलावातील गाळ काढण्याचे निर्देश

0
Nitesh Rane in Amravati: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची आढावा बैठक; तलावातील गाळ काढण्याचे निर्देश

यंदा पावसाने तीन दडी मारल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर) मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कार्यालय, वाशिम येथे अमरावती विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागातील अवर्षण परिस्थिती, जलसाठे आणि मच्छीमार बांधवांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार श्याम खोडे, आमदार भावनाताई गवळी, आमदार सई डहाके, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांचे सहाय्यक मत्स्य आयुक्त तसेच संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ‘Trigger-1’ अंतर्गत अवर्षण परिस्थितीचा आढावा घेताना विभागातील विविध तलाव व जलाशयांची संख्या, कोरडे पडलेले तलाव तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पर्जन्यमानाची स्थिती याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सध्या विभाग ‘Trigger-1’ मध्ये असल्याने उपलब्ध जलसाठ्यांचे संवर्धन करण्यासोबतच पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तलावांमधील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

https://www.prahaar.in/2026/10/05/minister-nitesh-rane-reprimands-officials-for-keeping-fishermens-proposals-pending/

अवर्षणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी उपलब्धता, आवश्यक उपाययोजना तसेच दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या मच्छीमार बांधवांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे जास्तीत जास्त कॅम्प आयोजित करून ही योजना तळागाळातील मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here