Home क्रीडा IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला

IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला

0
IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला
IND vs WI T20: प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? गौतम गंभीरने एका वाक्यात विषय संपवला (Photo: ANI)

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताने पाकिस्तानला पराभूत करत गोल्ड मेडल पटकावलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकांसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. असं असताना या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत चर्चा रंगली आहे. प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी असेल की नाही? याबाबत खलबतं सुरू आहेत. असं असताना गौतम गंभीरने या प्रश्नावर आपलं रोखठोख मत मांडलं आहे. गौतम गंभीरने स्पष्ट सांगितलं की, वैभव सूर्यवंशी जेव्हा संघात आला तेव्हा त्याच्यासाठी काही गोष्टी सोप्या नव्हत्या. वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्मात होता. पण जुन्या फलंदाजांना बाहेर करणं शक्य नव्हतं. याबाबत त्याच्याशी स्पष्ट बोलणंही झालं होतं.

काय म्हणाला गौतम गंभीर?

टी20 वर्ल्डकप 2026 नंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. या संघात वैभव सूर्यवंशी होता, पण त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. पण इंग्लंड दौऱ्यात संजू सॅमसनच्या जागी त्याला संधी दिली गेली. पण एशियन गेम्समध्ये वैभव आणि संजू दोघंही संघात एकत्र खेळले. त्यामुळे आता वैभव सूर्यवंशी प्लेइंग 11 चा भाग असेल, असं बोललं जात आहे. यावर गौतम गंभीर म्हणाला की, ‘मी एक गोष्ट बोललो होतो की सोशल मीडिया आणि बाहेरचं लोकं प्लेइंग 11 चा निर्णय घेऊ शकत नाही. ड्रेसिंग रूममध्ये कोण आहे, कोच आणि कर्णधाराला काय वाटतं, सामना जिंकण्यासाठी काय कॉम्बिनेशन असावं यावर सर्वस्वी अवलंबून असतं. याशिवाय गेल्या काही काळात कोण चांगलं खेळलं. कारण जर वैभव आज खेळला, तर वैभवमुळे ज्या खेळाडूला वगळले जाईल, मग तो संजू असो वा अभिषेक, त्याच्यासोबत माझी चर्चा अवघड होईल.’

https://www.prahaar.in/2026/10/05/half-of-indias-squad-for-the-2027-odi-world-cup-finalized-aakash-chopra-reveals-6-names/

कॉम्बिनेशनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही…

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, ‘गेल्या दीड वर्षात मोठा प्रभाव पाडलेल्या संघाच्या कॉम्बिनेशनकडे आपण अचानक दुर्लक्ष करू शकत नाही. तीन-चार अपयशानंतर एका तरुण खेळाडूसाठी त्यांना वगळणे योग्य ठरणार नाही.’ इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी तीन सामन्यात खेळला. पण तिन्ही सामन्यात फेल गेला. पण झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने कमबॅक केलं आणि चांगली कामगिरी केली. संजू सॅमसन या दौऱ्यात नसल्याने अभिषेक शर्मासोबत वैभवने ओपनिंग केली. एशियन गेम्समध्येही वैभवने ओपनिंग केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत एशियन गेम्समधील कॉम्बिनेशन असेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण गौतम गंभीरने या विषयात गेल्या दीड वर्षाचं उदाहरण दिल्याने संभ्रम वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here