Home महाराष्ट्र नाशिक Nashik TCS Case : TCS प्रकरणाची सुनावणी आता नाशिक जिल्हा न्यायालयात ; पेन ड्राईव्ह, दस्तऐवज, मुद्देमाल हस्तांतरित करण्याचे आदेश

Nashik TCS Case : TCS प्रकरणाची सुनावणी आता नाशिक जिल्हा न्यायालयात ; पेन ड्राईव्ह, दस्तऐवज, मुद्देमाल हस्तांतरित करण्याचे आदेश

0
Nashik TCS Case : TCS प्रकरणाची सुनावणी आता नाशिक जिल्हा न्यायालयात ; पेन ड्राईव्ह, दस्तऐवज, मुद्देमाल हस्तांतरित करण्याचे आदेश

Nashik : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी (TCS) संबंधित गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय-१० तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांच्या न्यायालयात होणार आहे. या प्रकरणातील विशेष केस क्र. ५५/२०२६ इतर सत्र खटल्यांसोबत एकत्रितपणे चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिकचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून हे प्रकरण जिल्हा न्यायालयात (Nashik District Court) वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार या प्रकरणाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे, पेनड्राइव्ह तसेच इतर जप्त मुद्देमाल विशेष संदेशवाहकाद्वारे जिल्हा न्यायालयात पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सीआयएस (CIS) प्रणालीमध्ये प्रकरण वर्ग झाल्याची नोंद करण्याचे निर्देश न्यायालयाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/05/nashik-tcs-case-a-new-crisis-for-nida-khan-she-secured-bail-in-serious-cases-but-now-her-husband/

गुन्हा क्रमांक १५६/२०२६ मध्ये गंभीर आरोप

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १५६/२०२६ मध्ये संशयित निदा एजाज खान, दानिश एजाज शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे नमूद आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, अॅट्रॉसिटी कायदा तसेच संबंधित इतर कायद्यांनुसार गुन्हेगारी कट, बलात्कार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे आदी आरोपांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल पुराव्यांचीही होणार तपासणी

या प्रकरणाचा समावेश इतर सात प्रमुख सत्र खटल्यांसोबत करण्यात आल्याने संबंधित तांत्रिक व डिजिटल पुरावे एकाच न्यायालयासमोर सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल पुराव्यांची तपासणी, कागदपत्रांची नोंद आणि साक्षीदारांची साक्ष याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया अधिक समन्वयाने पार पडू शकते. या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन सुनावणीत निश्चित होणार असून, अंतिम निर्णय न्यायालयाच्या पुरावे व साक्षीच्या आधारे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here