Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon Accident News : भीषण अपघात ! आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला अन् अनर्थ घडला ; तरुणाचा मृत्यू

Jalgaon Accident News : भीषण अपघात ! आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला अन् अनर्थ घडला ; तरुणाचा मृत्यू

0
Jalgaon Accident News : भीषण अपघात ! आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणायला निघाला अन् अनर्थ घडला ; तरुणाचा मृत्यू

Jalgaon Accident News : आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरून जळगावकडे निघालेल्या 30 वर्षीय तरुणाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. पाळधी-तरसोद बायपासवरील टहाकळी फाट्याजवळील रेल्वे पुल परिसरात हा अपघात घडला. ललित मनोहर झंवर (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ललितच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ललित दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्यासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, तसेच हात-पायांना फ्रॅक्चर झाले. शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

https://www.prahaar.in/2026/10/05/nashik-tcs-case-a-new-crisis-for-nida-khan-she-secured-bail-in-serious-cases-but-now-her-husband/

बहिणीला आणण्यासाठी निघाला अन्…

ललितच्या घरी आजोबांच्या श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने तो बहिणीला आणण्यासाठी दुचाकीवरून जळगावकडे निघाला होता. मात्र, वाटेतच काळाने त्याच्यावर घाला घातला. विशेष म्हणजे, आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात ललितच्या लग्नाची बोलणी आणि लग्नाची तयारी करण्याचे कुटुंबीयांचे नियोजन होते. लग्नाच्या तयारीत असलेल्या तरुणाचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने झंवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नातेवाईक आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाळधी-तरसोद बायपास ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट ?

दरम्यान, पाळधी-तरसोद बायपासवर सातत्याने अपघात होत असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन महिन्यांत या मार्गावर झालेला हा आठवा बळी असल्याचा दावा करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here