Home क्राईम पुण्यातील २२ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी निघाली, पण परतलीच नाही… ‘तो’ ईमेल वाचून पालकांना बसला धक्का

पुण्यातील २२ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी निघाली, पण परतलीच नाही… ‘तो’ ईमेल वाचून पालकांना बसला धक्का

0
पुण्यातील २२ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी निघाली, पण परतलीच नाही… ‘तो’ ईमेल वाचून पालकांना बसला धक्का

पुण्यातील २२ वर्षांची तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षाला असलेली हवेली तालुक्यातील तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरातून बाहेर पडली. खाजगी कॉलेजमध्ये शिकत असलेली ही तरुणी आपल्या नेहमीच्या वेळी कॉलेजला गेली. परंतु रात्री उशीर झाला तरी मुलगी घरी परतली नसल्याने आई चिंतेने व्याकुळ झाली. घरच्यांनी सगळीकडे तिला शोधायला सुरुवात केली. ती कोणत्या नातेवाईकांकडे किंवा मित्र-मैत्रिणींकडे गेली आहे का हेदेखील घरच्यांनी तपासले. पण मुलगी कुठेच सापडली नाही.

ही शोधाशोध सुरु असताना घरच्यांना एक मेल आला. बेपत्ता मुलीने स्वतः हा मेल पाठवला होता. यात मुलीने आपलं एका मुलावर प्रेम असल्याचे नमूद केले. ‘मी एका मुलासोबत पळून जातेय. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्याला एड्स आहे हे मला माहित आहे तरीदेखील मी त्याच्याशी लग्न करणार आहे.’ असा संदेश तिने ईमेलमध्ये लिहिला. हा ईमेल बघून घरच्यांना पायाखालची जमीन सरकली. हा सर्व प्रकार पुण्यातील फुरसुंगी पोलीस हद्दीत घडला. आपल्याला आलेला ईमेल बघून तरुणीच्या आई आणि भाऊ बहिणीला धक्का बसला.

https://www.prahaar.in/2026/10/04/we-are-not-cockroaches-we-are-panthers-the-arrogance-of-the-cockroach-camp-is-not-good-union-minister-of-state-ramdas-athawale/

आपली मुलगी सुरक्षित आहे का? ती कोणासोबत आहे? तो मुलगा कोण आहे? ती कुठे आहे? अशा प्रश्नांनी तिचे आईवडील चिंतातुर झाले. काळजीपोटी तरुणीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फुरसुंगी पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस यासंदर्भात सध्या बेपत्ता तरुणीचा आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here