Home एक्सक्ल्युजिव्ह Legislative Council Election : मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; पुणे आणि नागपूरच्या उमेदवारांची नावं समोर

Legislative Council Election : मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; पुणे आणि नागपूरच्या उमेदवारांची नावं समोर

0
Legislative Council Election : मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; पुणे आणि नागपूरच्या उमेदवारांची नावं समोर

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने पुणे आणि नागपूर विभागातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना पक्षाने तिकीट जाहीर केले आहे.

याशिवाय पुणे विभागातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


https://www.prahaar.in/2026/10/03/pankaj-bhoyar-infiltration-of-anti-social-elements-into-the-cjps-agitation/

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर 2026 रोजी जारी करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असून 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here