Home ब्रेकिंग न्यूज Marathi Literature : पुण्यात उभारणार ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’; केंद्र सरकारची मंजुरी

Marathi Literature : पुण्यात उभारणार ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’; केंद्र सरकारची मंजुरी

0
Marathi Literature : पुण्यात उभारणार ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’; केंद्र सरकारची मंजुरी
मंत्री उदय सामंत(Photo:UdaySamant/X)

मुंबई : अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या (3 ऑक्टोबर) पूर्वसंध्येला जगभरातील मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुण्यातील ऐतिहासिक डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये (मानिव अभिमत विद्यापीठ) ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या महत्त्वाच्या केंद्राच्या उभारणीमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, संशोधनासाठी आणि विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होणार आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी तज्ज्ञांमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला असून, तो लवकरच सादर केला जाईल.

ऐतिहासिक निर्णयाचापुढील टप्पा

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ (Classical Language) दर्जा बहाल केला होता. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचाच पुढील टप्पा म्हणून आता पुण्यात या उत्कृष्ट केंद्राची स्थापना केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/10/02/mumbai-goregaon-dadasaheb-phalke-chitranagari-set-for-further-expansion-government-approves-land-allocation-to-the-cultural-affairs-department/

मंत्री उदय सामंत यांनी मानले आभार

या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेले हे यश आपल्या मराठी संस्कृतीचे आणि भाषेचे वैभव अधिक उंचावणारे आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल मी समस्त मराठी भाषिकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” या केंद्रामुळे मराठी भाषेचा प्राचीन वारसा, इतिहास आणि साहित्याचा जागतिक पातळीवर विस्तार होण्यास मोठी मदत होणार असून, संशोधकांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here