Home क्रीडा Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या

Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या

0
Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या
Asian Games 2026: टी20 क्रिकेट गोल्ड मेडलसाठी भारत पाकिस्तान भिडणार, कुठे आणि कधी सामना ते जाणून घ्या (Photo: ANI/BCCI Twitter)

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या पुरूष टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. त्यामुळे एका हायव्होल्टेज सामन्याची पर्वणी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला, तर पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. आता सुवर्णपदकाची लढाई भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाला सुवर्ण, तर पराभूत होणाऱ्या संघाला रौप्य पदक मिळणार आहे. तर कांस्य पदकासाठी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. कांस्य पदकाच्या लढतीत विजेत्या संघाला पदक मिळेल. तर पराभूत संघाला रिकाम्या हाती जावं लागले. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची पदकं निश्चित झाली असून सुवर्ण पदक कोण मिळवणार? याची उत्सुकता आहे.

एशियन गेम्स स्पर्धे भारत पाकिस्तान अंति सामना कधी?

एशियन गेम्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीचा सामना 3 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. हा सामना जापानच्या कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 10 वाजता सामन्याला सुरूवात होईल.

https://www.prahaar.in/2026/10/02/odi-world-cup-2027-india-and-pakistan-will-face-each-other-not-just-once-but-two-or-three-times-know-how/

भारत पाकिस्तान सामना कुठे पाहता येईल?

भारत पाकिस्तान सामन्याचं थेट लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच सोनी लिव एप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रिमिंग असेल.

सामन्यात पाऊस पडला तर सुवर्ण पदक कोणाला?

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला आणि हा सामना रद्द करण्याची वेळ आली तर सुवर्णपदकाचा मानकरी कोण? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींना पडला आहे. जर तशी स्थिती ओढावली तर दोन्ही संघांना संयुक्तरित्य सुवर्णपदक मिळेल. तर रौप्य पदक कोणालाही दिलं जाणार नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशान किशन, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, यश ठाकुर, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, विपराज निगम.

पकिस्तान संघ: साहिबजादा फरहान (कर्णधार), हैदर अली, अब्दुल समद, माज सदाकत, साद मसूद, सैम अयूब, हसन नवाज, उस्मान खान, मोहम्मद वसीम जूनियर, अहमद दानियाल, आकिफ जावेद, अली रजा, अरफात मिन्हास, सुफियान मुकीम, अबरार अहमद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here