Home ब्रेकिंग न्यूज Sukanya Samriddhi Yojana :  लेकीच्या भविष्यासाठी खास योजना! वर्षाला फक्त 500 रुपये जमा केल्यास 21 वर्षात किती तयार होईल फंड?

Sukanya Samriddhi Yojana :  लेकीच्या भविष्यासाठी खास योजना! वर्षाला फक्त 500 रुपये जमा केल्यास 21 वर्षात किती तयार होईल फंड?

0
Sukanya Samriddhi Yojana :  लेकीच्या भविष्यासाठी खास योजना! वर्षाला फक्त 500 रुपये जमा केल्यास 21 वर्षात किती तयार होईल फंड?

मुंबई : मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायचे असेल, तर सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय मानला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेत सध्या 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जात असून, कमी रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करता येते.  (Suknay Samriddhi Yojna)

500 रुपयांची वार्षिक बचत

या योजनेत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आई-वडील किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने हे खाते सुरू करू शकतात. एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये जमा करण्याची सुविधा आहे. साधारणपणे एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही खाती उघडता येतात. (Small Savings Scheme)

खाते सुरू केल्यानंतर 15 वर्षांपर्यंत पैसे जमा करता येतात. मात्र, योजनेची मुदत 21 वर्षांची असते. म्हणजे 15 वर्षांनंतरही पुढील 6 वर्षे खात्यातील रकमेवर व्याज मिळत राहते.

https://www.prahaar.in/2026/10/01/commercial-cylinder-prices-hiked-on-the-very-first-day-of-october-domestic-gas-rates-remain-unchanged/

जर एखाद्या व्यक्तीने दरवर्षी 500 रुपये जमा केले, तर 15 वर्षांत एकूण 7,500 रुपयांची गुंतवणूक होईल. सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार 15 वर्षांनंतर ही रक्कम अंदाजे 13,800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्यानंतर पुढील 6 वर्षे व्याज मिळत राहिल्यास 21 वर्षांच्या अखेरीस हा निधी सुमारे 22,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही रक्कम गुंतवणुकीची तारीख आणि त्या वेळच्या व्याजदरानुसार बदलू शकते.

या योजनेत मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी खात्यातील 50 टक्के रक्कम काढण्याची सुविधा आहे. तसेच काही अटींच्या अधीन राहून मुलीच्या लग्नासाठी खाते मुदतपूर्व बंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

सुरक्षित गुंतवणूक, आकर्षक व्याजदर आणि करसवलतींचा लाभ मिळत असल्याने सुकन्या समृद्धी योजना लेकीच्या भविष्यासाठी दीर्घकालीन बचतीचा पर्याय ठरू शकते.

व्याजदर बदलू शकतो

एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात व्याजदर कधी बदलू शकतो.  8.2% हा सध्याच्या तिमाहीसाठी लागू असलेला दर आहे. सरकार वेळोवेळी अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते. त्यामुळे भविष्यातील अंतिम रक्कम बदलू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here