Home नवरात्रौत्सव Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

0
Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या काळात उपवास, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच नवरात्रीच्या नऊ रंगांनाही विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांत विशेष लोकप्रिय झाली आहे. महिला, मुली, ऑफिसमधील ग्रुप्स तसेच विविध मंडळांकडून नवरात्रीचे रंग पाळले जातात. आता पुरुषही या ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसतात. तर यंदाच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी कोणता रंग कधी घालायचा? जाणून घेऊया संपूर्ण यादी…

नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग २०२६

११ ऑक्टोबर – रविवार : नारंगी

१२ ऑक्टोबर – सोमवार : पांढरा

१३ ऑक्टोबर – मंगळवार : लाल’

१४ ऑक्टोबर – बुधवार :रॉयल ब्लू

१५ ऑक्टोबर – गुरुवार : पिवळा

१६ ऑक्टोबर – शुक्रवार : हिरवा

१७ ऑक्टोबर – शनिवार : राखाडी

१८ ऑक्टोबर – रविवार : जांभळा

१९ ऑक्टोबर – सोमवार : मोरपंखी हिरवा

https://www.prahaar.in/2026/09/29/sharadiya-navratri-2026-10-when-does-sharadiya-navratri-2026-begin-october-10-or-11/

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे कपडे का घालतात ?

नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग पाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे. त्यानुसार महिला आणि मुली नऊ दिवस त्या-त्या रंगाचे कपडे, साड्या किंवा इतर पारंपरिक पोशाख परिधान करतात. ऑफिसमध्येही नवरात्रीच्या काळात ‘नवरात्री कलर डे’ साजरा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. महिला ग्रुप्सपासून ते विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांपर्यंत अनेक जण या रंगांनुसार पोशाख परिधान करतात.

नऊ रंगांचा पोशाख घालणे बंधनकारक आहे का ?

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ठरावीक रंगांचे कपडे घालणे ही धार्मिक सक्ती नसून प्रामुख्याने परंपरा आणि उत्सवाचा एक भाग आहे. कोणता रंग घालायचा किंवा ही परंपरा पाळायची की नाही, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि आवडीचा विषय आहे. नवरात्रीच्या उत्सवात या रंगांच्या माध्यमातून एकता, उत्साह आणि सामूहिक सहभाग व्यक्त केला जातो. त्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत एकाच रंगाचे कपडे परिधान करून नवरात्रीचा आनंद साजरा करण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here