भारतीय संघाचा फिरकी मास्टर आर. अश्विनच्या नावाने चेन्नईतील ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये विशेष स्टँड उभारला जाणार आहे.
ज्या मैदानात अश्विनने क्रिकेटचे धडे गिरवले, त्याच 110 वर्षे जुन्या चेन्नई स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीला आता त्याचे नाव दिले जाईल.
चेन्नईत होणाऱ्या BBL च्या उद्घाटन सामन्यापूर्वी 12 डिसेंबर रोजी या स्टँड्सचे अनावरण होईल; ज्याला अश्विन आणि श्रीकांत उपस्थित राहतील.
अश्विनने भारतासाठी 106 कसोटीत 537 विकेट्स आणि 3,503 रन्स (6 शतके) केले आहेत; तसेच वनडेत 156 आणि टी-20 मध्ये 72 बळी घेतले आहेत.
अश्विन व्यतिरिक्त भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू के. श्रीकांत आणि एस. व्यंकटराघवन यांच्या नावानेही इतर स्टँड्स उभारली जातील.