Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी

0
Maharashtra Government : कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी
फोटो सौजन्य : X (ट्विटर)

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र कर्जखात्यांना लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आणखी ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून पात्र शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यांमध्ये लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. (Maharashtra Government)

https://www.prahaar.in/2026/09/29/10-major-decisions-by-the-maharashtra-cabinet/

मंत्रिमंडळाच्या २ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ला मंजुरी देण्यात आली होती. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे या योजनेसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी यापूर्वी विविध शासन निर्णयांद्वारे ११ हजार १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, उपलब्ध असलेल्या उर्वरित निधीपैकी ३ हजार कोटी रुपये वितरित करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Government)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here