Home ब्रेकिंग न्यूज Mumbai- Ahamadabad Bullet Train Project: महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, भिवंडीमध्ये पहिल्या स्टील पूलाची उभारणी

Mumbai- Ahamadabad Bullet Train Project: महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, भिवंडीमध्ये पहिल्या स्टील पूलाची उभारणी

0
Mumbai- Ahamadabad Bullet Train Project: महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, भिवंडीमध्ये पहिल्या स्टील पूलाची उभारणी
फोटो सौजन्य: ANI News

ठाणे: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधित महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रातील पहिला- वहिला स्टीलचा पूल बसवण्यात आला आहे. मुंबई- नाशिक मार्गावरील दिवे- अंजूर गावाजावळ हा पूल उभारण्यात आलेला आहे. उभारण्यात आलेला हा पूल 100 मीटरचा आहे. महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. उभारण्यात आलेला 1 हजार 405 मेट्रिक टन वजनाचा हा स्टीलचा पूल आहे. काल यशस्वीरित्या पूल उभारण्यात आला आहे. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा काल पार पडला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/goregaon-film-city-has-demanded-174-crore-rupees-from-mumbai-municipal-corporation/

NHSRCL या कंपनीकडून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील महत्त्वाचे काम केले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दिवे- अंजूर गावाजवळ उभारण्यात आलेल्या पुलाचं सुद्धा काम याच कंपनीकडून करण्यात आलं आहे. हा संपूर्ण पूल तामिळनाडूतील त्रिची वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आला. पूलाचे सुट्टे भाग आणून कंपनीकडून रात्रीच्या वेळीत पुलाची उभारणी करण्यात आली. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये, भिवंडीतील दिवे- अंजूर गावात NH-3 वर सोमवारी रात्री 14 मीटर उंच आणि 14 मीटर रुंद असा पुलाची उभारणी करण्यात आली.

बुलेट ट्रेनच्या पुलाच्या उभारणीमुळे संपूर्ण मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर नियोजित असलेल्या 28 स्टील पुलांपैकी 16 पूल आतापर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती एनएचएसआरसीएलने दिली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत या प्रकल्पात देशांतर्गत तांत्रिक कौशल्य आणि सामग्रीचा वापर करत, हा पूल तामिळनाडूतील त्रिचीमध्ये एका कार्यशाळेत तयार करण्यात आला. पुलाच्या भव्य- दिव्य निर्मितीनंतर, पुलाचे सांगाडे बांधकामस्थळी अवजड ट्रेलरच्या साहाय्याने तामिळनाडूहून भिवंडीमध्ये आणण्यात आले. इथे आणल्यानंतर त्याची जोडणी करण्यात आली. पुलाच्या जोडणीचे काम रात्रीच्या वेळी पुर्ण करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/strong-protest-in-the-municipal-corporation-hall-against-the-action-taken-on-huts-up-to-14-feet-in-height/

100 मीटर लांबीचा पूल जमिनीपासून 17.5 मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. तात्पुरत्या ट्रेसल्सवर 22 स्किड अरेंजमेंट्स आणि 54 हजार 076 हाय- स्पीडच्या टॉर-शिअर बोल्ट्सच्या साहाय्याने तो संपूर्ण पूल जोडण्यात आला आहे. पुलाचा टिकाऊपणा आणि कंपन नियंत्रणाची क्षमता वाढविण्यासाठी संरक्षक रंगकाम प्रणाली आणि इलॅस्टोमेरिक बेअरिंग्जची तरतूद करण्यात आली आहे. पुलाच्या जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 150 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन हॉलो जॅक्सचा वापर करून प्री- टेन्शनिंग तंत्राच्या सहाय्याने स्वयंचलित यंत्रणेद्वारे पूल सरकवून व्यवस्थेप्रमाणे तो सेट करण्यात आला. हे काम पूर्ण होताच, कामगारांकडून आनंद साजरा करण्यात आला.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ह्या हाय स्पीड रेल कॉरिडॉरवरची लांबी 508 किमी इतकी आहे, जी मुंबईपासून गुजरातमधील अहमदाबादसोबत जोडण्यात येणार आहे. हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू झाल्यावर दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारचे उद्दिष्ट आहे. ठाण्यातील स्टील पुलाची उभारणी ही या कॉरिडॉरच्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, तसेच हाय-स्पीड रेल्वेच्या पायाभूत सुविधांना आधार देण्यासाठी या मार्गावर अनेक स्टील पूल नियोजित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here