Home क्रीडा Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा धावण्याच्या ट्रॅकवर जलवा! 1500 मीटरमध्ये रौप्यपदक; भारताच्या खात्यात आणखी एक पदक

Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा धावण्याच्या ट्रॅकवर जलवा! 1500 मीटरमध्ये रौप्यपदक; भारताच्या खात्यात आणखी एक पदक

0
Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा धावण्याच्या ट्रॅकवर जलवा! 1500 मीटरमध्ये रौप्यपदक; भारताच्या खात्यात आणखी एक पदक
पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत गुलवीर सिंगने पटकावले रौप्य पदक(Photo:ANI)

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवलीय. जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा स्टार धावपटू गुलवीर सिंग याने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून देशाच्या नावावर आणखी एका पदकाची नोंद केली आहे. अंतिम फेरीत त्याने 3:36.72 अशी स्वतःची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत हे यश मिळवले.

रोमांचक अंतिम सामना

12 खेळाडूंच्या या अंतिम शर्यतीत गुलवीर सुरुवातीपासूनच शर्यतीत टिकून राहिला आणि शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत त्याने आपले पदक निश्चित केले. जपानच्या काझुतो इझावा याने 3:36.35 अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. गुलवीरने इझावाच्या ‘गेम्स रेकॉर्ड’ वेळेपेक्षा केवळ 0.37 सेकंद उशिरा रेस पूर्ण केली. तर जपानचाच नागिया मोरी (3:37.92) याने कांस्यपदक पटकावले. मोरीपेक्षा गुलवीर एका सेकंदापेक्षा जास्त फरकाने पुढे राहिला. या फायनलमध्ये आणखी एक भारतीय खेळाडू युनूस शाह 3:43.88 वेळेसह नवव्या स्थानावर राहिला.(Gulveer Singh Silver Medal)

https://www.prahaar.in/2026/09/28/path-cleared-for-a-separate-policy-for-students-from-single-mother-families/

ऐतिहासिक कामगिरी आणि दुसरे पदक

मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने याच प्रकारात कांस्यपदक जिंकले होते, त्यामुळे गुलवीरचे हे रौप्य पदक भारतासाठी मोठी सुधारणा दर्शवणारे ठरले आहे. विशेष म्हणजे, आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील गुलवीर सिंगचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत 28:29.38 वेळ नोंदवत त्याने पहिले रौप्य पदक जिंकले होते. या 10,000 मीटर शर्यतीत बहरीनच्या बिरहानु बालेवने सुवर्णपदक पटकावले होते.

सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत गुलवीरने भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांत कोरले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.(Gulveer Singh Silver Medal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here