Home ब्रेकिंग न्यूज NCP Merger News: आम्ही कालही एनडीएसोबत, आजही आणि भविष्यातही; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरे यांची भूमिका

NCP Merger News: आम्ही कालही एनडीएसोबत, आजही आणि भविष्यातही; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरे यांची भूमिका

0
NCP Merger News: आम्ही कालही एनडीएसोबत, आजही आणि भविष्यातही; विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरे यांची भूमिका
फोटो सौजन्य: X Account

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आम्ही कालही एनडीएसोबत होतो, आजही आहोत आणि भविष्यातही आमची वाटचाल एनडीएसोबतच असेल, असे तटकरे यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/09/28/it-is-not-in-the-farmers-interest-to-dispatch-relief-funds-to-drought-affected-areas-before-the-damage-assessments-are-fully-completed/

विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरे यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शप) शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावत, “आम्ही कुणासोबत जाणार नाही, ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे,” अशी भूमिका मांडली. त्यानंतर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर आपण भाष्य करणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, पवारांनी ही भूमिका आत्ताच का मांडली, असा प्रश्न विचारला असता, “पवारांचे टायमिंग त्यांनाच माहिती,” असे ते म्हणाले. राजकारणात शरद पवारांनी अनेकदा आपल्या पद्धतीने टायमिंग साधले असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या विधानामागील नेमके कारण त्यांनाच माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/09/28/water-level-in-shivnatakali-lake-drops-eligible-fishermen-to-receive-assistance-following-damage-assessment-said-by-minister-nitesh-rane/

शरद पवारांच्या ‘टायमिंग’वर भाष्य

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही विलीनीकरणाबाबत भूमिका मांडताना, विलीनीकरण झाले तर अजित पवार गटाने शरद पवार यांच्या पक्षात यावे, अशी अट असल्याचे सांगितले. यावर तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांचे वक्तव्य आपण ऐकले नसल्याचे सांगितले. त्यांनी तसे वक्तव्य केले असेल तर ते त्यांच्या वैयक्तिक भूमिकेपुरते मर्यादित असल्याचे तटकरे म्हणाले. “अजितदादांच्या नेतृत्वाखालीच आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही कालही एनडीएसोबत होतो, आजही एनडीएसोबत आहोत आणि भविष्यातील आमची वाटचालही एनडीएसोबतच असेल,” असे तटकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here